शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

संघाच्या स्वयंसेवकांचे कॉंग्रेस खासदाराकडून कौतुक


http://www.esakal.com/esakal/20121110/5723475820018899270.htm


संघाच्या स्वयंसेवकांचे कॉंग्रेस खासदाराकडून कौतुक



Saturday, November 10, 2012 AT 04:00 PM (IST)

भोपाळ- कॉंग्रेसचे खासदार देवास सज्जनसिंह वर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे कौतुक करीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सडकून टीका केली आहे. सूरजकुंड येथील चिंतन शिबिरानंतर कॉंग्रेसच्या खासदाराने कार्यकर्त्यांवर तोंडसुख घेतल्याने कॉंग्रेसला घरचा अहेर मिळाला आहे.

निमूच येथील सभेला संबोधित करताना देवास सज्जनसिंह वर्मा म्हणाले, की संघाचे स्वयंसेवक भाजपसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने काम करतात तर आपले नेते एसीच्या ऑफिसबाहेर पडत नाहीत. आगामी निवडणुकांमध्ये आपल्यालाच यश मिळेल, अशा भ्रमात कॉंग्रेस नेते आहेत. परंतु, त्यांनी जमिनीवर उतरून प्रचार केला नाही तर निवडणुकीत यश मिळणे सहज शक्‍य होणार नाही. दिल्लीतील नेते आपल्या कामात मग्न आहेत. त्यांना मध्य प्रदेशमधील कामात रुची नाही. मध्य प्रदेशमधील जंगलांमध्ये दौरे करण्यास कॉंग्रेसचे नेते इच्छुक नसतात. भाजपला संघाचा पाठिंबा आहे. संघाच्या पाठिंब्यावर भाजप जिंकून येऊ शकते. निवडणुका कशा जिंकायच्या हे स्वयंसेवकांना बरोबर माहीत आहे.

सभेनंतर वार्ताहरांशी बोलताना मात्र वर्मा यांनी आपण स्वयंसेवकांचे कौतुक केल्याचा इन्कार केला. 
फोटो गॅलरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा