http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16775682.cms
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठीवापरलेल्या सायकली ज्या दुकानातून घेतल्या त्यादुकानदाराला आणि तेथे काम करणा - यांनी दिलेल्यामाहितीवरून संशयीतांची रेखाचित्रे तयार करण्यात आल्याचेसमजते . लवकरच ती रेखाचित्र मीडियासमोर आणलीजातील अशीही माहिती मिळते . मात्र पोलिसांनी यासंदर्भातकोणतीही माहिती दिलेली नाही .
बुधवारी रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरलेल्यासायकली ज्या दुकानातून घेतल्या त्या दुकानदाराला आणितेथे काम करणा - यांना एटीएसने चौकशीसाठी गुरुवारीताब्यात घेतले होते . त्या दुकानदाराने आणि तेथे काम करणा- यांनी पोलिसांना तीन संशयीतांची माहिती द्यायला आणि त्यावरून रेखाचित्र तयार करण्यास मदत केल्याचेहीसमजते आहे . ज्यावेळी हे तीन संशयीत सायकल खेरदी करायला आले होते तेव्हा त्या सायकलना पुढे बास्केटबसवण्यात आले नव्हते . त्यामुळे संशयीतांची पंचाईत झाली . त्यांनी दुकनदाराला सायकलीस बास्केट बसवण्याससांगितले . बास्केट लावून होईपर्यंत ते बराच वेळ दुकानातच रेंगाळत होते . त्यामुळे त्यांची माहिती देणे दुकानदारआणि तेथे काम करणा - या अधिक सोपे गेले , अशी माहिती समोर येत आहे .
कसबा पेठेत हे सायकलचे दुकान असून , तिथून दोन किंवा तीन सायकली विकत घेण्यात आल्या होत्या . यासायकल कोण घेतल्या त्याचा शोध लागला तर तपासाला दिशा मिळेल असे पोलिसांनी या आधीच स्पष्ट केले होते.
बुधवारी रात्री आठ ते पावणे नऊच्या सुमारास गजबजलेल्या जंगली महाराज मार्गावर लागोपाठ चार बॉम्बस्फोटझाले . ते कमी तीव्रतेचे असले तरी ते बॉम्बस्फोटच होते . एटीएससह पोलीस या स्फोटांची कारणे शोधत असलीतरी अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत .==========================http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16774021.cms
मुंबईतही त्यांनी रेकी केली होती
Oct 12, 2012,
पुणे साखळी स्फोटातील दहशतवाद्यांचे टार्गेट
म . टा . प्रतिनिधी , पुणे
जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील इंडियन मुजाहिदीनचा ( आयएम ) दहशतवादी कातिल सिद्दिकीच्या हत्येचा बदलाघेण्यासाठी पुण्यात साखळी स्फोट घडवून आणलेल्या फिरोज सय्यद , असद खान व इम्रान खान यांनी मुंबईतहीरेकी केली होती , अशी माहिती उघड झाली आहे .
येरवडा कारागृहाच्या अंडासेलमध्ये स्थानिक गुंड शरद माहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव यांनीकातिलचा खून केला होता . त्याचा बदला घेण्यासाठी रियाज , इक्बाल भटकळने बॉम्बस्फोट घडवण्याचा कटरचला होता . त्यासाठी त्याने पुण्यातील काही ठिकाणींची रेकी करण्याचे आदेश दिले होते . तिघाही दहशतवाद्यांनीयेरवडा जेल , शिवाजीनगर कोर्टात रेकी केली होती . मात्र दोन्हीही ठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्याने त्यांचेकारस्थान यशस्वी झाले नाही .
त्यांनी माहोळ - भालेराव यांच्या कुटुंबीयांना मारण्याचा कट रचला . मात्र या दोघांच्या कुटुंबीयांचा पत्ता त्यांना नमिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला . मुंबईतही त्यांनी काही ठिकाणांची रेकी केली होती .
दरम्यान , भटकर बंधूंनी त्यांना पुणेच ' टार्गेट ' करण्याचा आदेश दिला . त्यानुसार त्यांनी जंगली महाराज रोडवरसाखळी बॉम्बस्फोट घडवून आणले .
स्फोटकेही जप्त
दिल्ली पोलिसांना माहिती मिळाल्यावर , त्यांनी २६ सप्टेंबर रोजी असद आणि इम्रानला ताब्यात घेतले . असदआणि इम्रानकडून चार किलो स्फोटके , आठ डिटोनेटर , नऊ व्होल्टच्या बॅटरीज , सर्किट्स , बॉल बेअरिंग , खिळेजप्त केले . फिरोजला १ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील निजामुद्दीन बसस्टँडवर पकडण्यात आले . त्याच्याकडून एककिलो स्फोटके , दोन डिटोनेटर जप्त केले .
पासपोर्टही होता तयार
असदने भारताबाहेर पळून जाण्याची तयारी केली होती . त्यासाठी त्याने पासपोर्टही तयार ठेवला होता . परंतुसुरक्षा यंत्रणांना वेळीच खबर मिळाल्याने त्याचा बेत अयशस्वी ठरला .

===================
मुजाहिदीन की हिंदुत्ववादी?
Aug 3, 2012, 03.16AM IST
* पुणे स्फोटांच्या सूत्रधारांबाबत गूढ कायम
वृत्तसंस्था, पुणे
अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने पुण्यात झालेले चार बॉम्बस्फोट घड्याळ्याच्या मदतीने टायमर लावून घडवण्यात आल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले. ही पद्धत इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेकडे बोट दाखवत असल्याचे केंद्रीय यंत्रणांनी म्हटले आहे. मात्र , त्याचवेळी बुधवारच्या स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील आणि त्याच्या पत्नीसह आणखी काही जणांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने या साखळी स्फोटांमागे मुजाहिदीन की हिंदुत्ववादी , असा प्रश्न कायम आहे.
जंगली महाराज रोडवर काही मिनिटांच्या अंतराने बुधवारी झालेल्या स्फोटांच्या ठिकाणी आढळलेल्या गोष्टींच्या तपासणीदरम्यान ठराविक वेळी स्फोट घडवण्यासाठी मनगटी घड्याळाचा टायमरसारखा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. याशिवाय स्फोटके ठेवण्यासाठी सायकल आणि कचरापेट्यांचा वापर करण्यात आल्याने हे स्फोट इंडियन मुजाहिदीनने घडवले असल्याचा संशय निर्माण झाला आहे. स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेटसोबत निओजेल या डोळ्यांना इजा करणाऱ्या द्रवपदार्थांचा वापर करण्यात आल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे हा दहशतवादी संघटनांनी नियोजनबद्ध पद्धतीने घडवलेला हल्ला असल्याबाबत तपास यंत्रणांचे एकमत झाले आहे.
त्याचवेळी , बालगंधर्व रंगमंदिराबाहेरील स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील याच्याकडेही संशयाची सुई वळली आहे. पाटीलच्या हातातील पिशवीत डिटोनेटर्स कसे आढळले , याबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या पत्नीचीही चौकशी सुरू आहे. बुधवारच्या स्फोटांसाठी वापरण्यात आलेल्या सायकली त्या दिवशी सकाळीच कसबा पेठेतील दुकानांतून खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या स्फोटांमागे कट्टर हिंदुत्ववादी संघटना असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
इंडियन मुजाहिदीनचा हात नाही?
स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले अमोनियम नायट्रेट, स्फोट घडवण्यासाठी टायमर म्हणून वापरलेली घड्याळे व सायकलींचा वापर यामुळे हे स्फोट इंडियन मुजाहिदीनने घडवल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, जास्त मनुष्यहानी व आर्थिक नुकसान यासाठी स्फोट घडवणाऱ्या मुजाहिदीनचा यात हात नसावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

============================
संशयीतांचे रेखाचित्र तयार?
Aug 3, 2012, 01.01PM ISTपुण्यात बुधवारी रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठीवापरलेल्या सायकली ज्या दुकानातून घेतल्या त्यादुकानदाराला आणि तेथे काम करणा - यांनी दिलेल्यामाहितीवरून संशयीतांची रेखाचित्रे तयार करण्यात आल्याचेसमजते . लवकरच ती रेखाचित्र मीडियासमोर आणलीजातील अशीही माहिती मिळते . मात्र पोलिसांनी यासंदर्भातकोणतीही माहिती दिलेली नाही .
बुधवारी रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरलेल्यासायकली ज्या दुकानातून घेतल्या त्या दुकानदाराला आणितेथे काम करणा - यांना एटीएसने चौकशीसाठी गुरुवारीताब्यात घेतले होते . त्या दुकानदाराने आणि तेथे काम करणा- यांनी पोलिसांना तीन संशयीतांची माहिती द्यायला आणि त्यावरून रेखाचित्र तयार करण्यास मदत केल्याचेहीसमजते आहे . ज्यावेळी हे तीन संशयीत सायकल खेरदी करायला आले होते तेव्हा त्या सायकलना पुढे बास्केटबसवण्यात आले नव्हते . त्यामुळे संशयीतांची पंचाईत झाली . त्यांनी दुकनदाराला सायकलीस बास्केट बसवण्याससांगितले . बास्केट लावून होईपर्यंत ते बराच वेळ दुकानातच रेंगाळत होते . त्यामुळे त्यांची माहिती देणे दुकानदारआणि तेथे काम करणा - या अधिक सोपे गेले , अशी माहिती समोर येत आहे .
कसबा पेठेत हे सायकलचे दुकान असून , तिथून दोन किंवा तीन सायकली विकत घेण्यात आल्या होत्या . यासायकल कोण घेतल्या त्याचा शोध लागला तर तपासाला दिशा मिळेल असे पोलिसांनी या आधीच स्पष्ट केले होते.
बुधवारी रात्री आठ ते पावणे नऊच्या सुमारास गजबजलेल्या जंगली महाराज मार्गावर लागोपाठ चार बॉम्बस्फोटझाले . ते कमी तीव्रतेचे असले तरी ते बॉम्बस्फोटच होते . एटीएससह पोलीस या स्फोटांची कारणे शोधत असलीतरी अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत .==========================http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16774021.cms
असदच्या नायगावातील घराची झडती
Oct 12, 2012, 02.31AM IST
दहशतवादी इम्रानसोबत पार्टनरशिपमध्ये ट्रॅव्हल्सचा व्यवसाय
म. टा. प्रतिनिधी , औरंगाबाद
पुणे बाँबस्फोट प्रकरणातील एक दहशतवादी असदखान जमशेदखान कय्युमखाणी (वय ३२) औरंगाबादेतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. हर्सूलपासून जवळच असलेल्या नायगावचा तो रहिवासी. एटीएसच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी नायगावातील त्याच्या घराची झडती घेतली. या वेळी काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून , त्याच्या लहान भावाला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
औरंगाबाद एटीएसचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ही माहिती दिली.
दरम्यान , असदच्या स्फोटातील सहभागाने अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे नायगाव भयभीत झाले आहे. एटीएसच्या घरझडतीच्या वेळी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य ; तसेच भीती दिसून येत होती.
असदच्या नायगावातील घरात त्याचे दोन मोठे आणि दोन लहान भाऊ आणि वृद्ध वडील राहतात. असद विवाहित असून , त्याला आठ वर्षांची मुलगी आहे. नगर येथे असदची सासुरवाडी आहे. मूळचे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला असदखानचे कुटुंब जमीनदार म्हणून ओळखले जाते. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्यांनी लातूर सोडले. २००२ साली नाशिक रोडवरील जांभाळा येथे शेती घेऊन त्यांनी तेथेच राहण्यास सुरुवात केली. २००६-०७ साली असदखानच्या कुटुंबाने जांभाळा येथील शेती विकून नायगावात मोठा वाडा घेतला. या ठिकाणी प्लॉटिंगचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. असदचे शिक्षण लातूर येथे झाले. तो बी. कॉम. असून , संगणकशास्त्राचेही त्याला ज्ञान असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
असदच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार , असद पंधरा दिवसांपूर्वी नगर येथे सासुरवाडीला गेला होता. त्याला पोलिसांनी तेथूनच ताब्यात घेतले. असदच्या सासऱ्याने बुधवारी नायगाव येथे आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली होती. गुरुवारी सायंकाळी एटीएसचे अधीक्षक रेड्डी , पीएसआय शिवा ठाकरे आणि पथकाने नायगाव गाठून असदच्या घराची झडती घेतली. असद राहत असलेल्या खोलीची तपासणी करण्यात आली. यामधून काही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली.
कटकटगेट भागात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय
असदखानचा कटकटगेट भागात रहमानी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने व्यवसाय आहे. हज आणि उमरा यात्रेचे आयोजन या ट्रॅव्हल्सकडून करण्यात येत होते. यामध्ये त्याचा मेव्हणा इरफान आणि त्याचा मित्र इम्रानचा समावेश असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. यापैकी इम्रानदेखील संशयित दहशतवादी असून , दिल्ली पोलिसांनी असदसोबत त्यालाही पकडले आहे.

======================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा