सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२

नांदेडमध्ये नवा 'हैदराबाद पॅटर्न' Oct 16, 2012,

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16829942.cms


नांदेडमध्ये नवा 'हैदराबाद पॅटर्न'

Oct 16, 2012, 
समीर मणियार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ' होमटाऊन ' नांदेड महापालिकेची सत्ता राखली असली , तरी काँग्रेसचापरंपरागत मतदार असलेल्या बहुतांश मुस्लिमांनी काँग्रेसकडे पाठ फिरवून मूळच्या हैदराबादच्या ' ऑल इंडियामजलीस इत्तेहदुल मुसलमीन ' चे ( एआयएमआयएम ) ११ नगरसेवक निवडून आणले . काँग्रेसचे दहा उमेदवारपाडण्याची कामगिरीही या नवख्या पक्षाने केली . काँग्रेसवरील नाराजी प्रकट करण्याचा हा नवा पर्यायअल्पसंख्याकांनी अन्यत्रही स्वीकारला , तर येत्या निवडणुकीत काँग्रेसचे धाबे दणाणण्याची शक्यता राजकीयवर्तुळात व्यक्त होत आहे .

वाचाः अशोक चव्हाणांनी गड राखला 

नांदेड महापालिकेची ​ निवडणूक दोन्ही काँग्रेसमध्ये होईल , असा अंदाज निकालाने फोल ठरवला . काँग्रेसला ८१पैकी ४१ जागा मिळाल्या . पण काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुस्लिमबहुल भागात एआयएमआयएमने २३जागा लढवित ११ निवडून आणल्या व पाय रोवले .

हैदराबाद संस्थानच्या गोवळकोंडाचे नवाब महमूद नवाज खान किल्लेदार यांनी १९२७ साली या पक्षाची स्थापनाकेली . या पक्षाच्या नावावरूनच तो केवळ मुस्लिमांचेच राजकारण करतो हे ध्वनित होते . १९८४ सालीहैदराबाद लोकसभा मतदारसंघातून पक्षातर्फे सुलतान सलाउद्दिन ओवेसी लोकसभेत गेले . हैदराबाद महापालिकेत१५० पैकी ४३ जागा पक्षाकडे सध्या आहेत . २००९ मध्ये आंध्र विधानसभेत आठ जागा लढवून सात जागांवरपक्षाला विजय मिळाला .

चिथावणीखोर भाषणे

मुस्लिमांच्या शैक्षणिक , आर्थिक व सामाजिक प्रश्नांकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच अल्पसंख्यकांनी नवा पर्यायस्वीकारल्याचे बोलले जाते . त्यांनी अंतिरंजित , कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी भाषणे केली , त्यासप्रत्युत्तर देऊ शकलो नाही , असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले . 
=============================


अशोक चव्हाणांनी गड राखला

Oct 16, 2012, 03.42AM IST  
नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या ८१ पैकी ४१ जागांवर त्यांचेउमेदवार विजयी झाले असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा पालिकेवरील वर्चस्व सिद्ध् ‍ केलेआहे राष्ट्रवादी कॉँग्रेसची मात्र येथे चौथ्या स्थानावर घसरण झाली असून ऑल इंडिया मझालिस इत्तेहादूलमुस्लमीन या नव्या पक्षाने १२ जागा मिळवत काँग्रेसच्या विजयी घोडदौडीस लगाम घातला 

मतमोजणी सुरू झाल्यापासूनच काँग्रेसने आघाडी घेतली महानगर पालिकेच्या ४० प्रभागामध्ये एकूण ८१ सदस्यनिवडायचे होते यापैकी एक सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ८० सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान झालेहोते 

पक्षीय बलाबल 

काँग्रेस ४१ 

शिवसेना १४ 

ऑल इंडिया मझलिस इत्तेहादूल मुस्लमीन ११ 

राष्ट्रवादी काँग्रेस १० 

भाजप २ 

संविधान पार्टी २ 

अपक्ष १ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा