शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

इम्रानच्या कुटुंबीयांची चौकशी Oct 13, 2012,


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16789172.cms



इम्रानच्या कुटुंबीयांची चौकशी

Oct 13, 2012, 
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित इंडियन मुजाहिदीनचे तीन दहशतवादी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पकडल्याचे वृत्त दुपारी दीड वाजता धडकले आणि त्याआधीच नांदेडच्या इम्रानखान पठाणचे वडील जावेदखान पठाण यांनी आपला मुलगा इम्रानखान चार सप्टेबर २०१२ पासून बेपत्ता असल्याची तक्रार गुरुवार सकाळी सव्वादहाच्या सुमारास येथील विमानतळ पोलिस ठाण्यात दिल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान या घटनाक्रमानंतर नांदेडची पोलिस यंत्रणा व एटीएसचे स्थानिक अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.

येथील पीराबुऱ्हानगरातील इम्रानखानच्या घरी पोलिसांनी गुरुवारपासून जवळपास मुक्काम ठोकला होता. कुटुंबीयांची कसून चौकशी केली जात होती मात्र मीडियापासून सर्व गोष्टी लपवून ठेवण्यात येत आहेत.

विमानतळ पोलिसांकडे दाखल झालेल्या मिसिंग कम्प्लेंटमध्ये इम्रानचे वर्णन नोंदविण्यात आले आहे. उंची ६ फूट ,घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या अंगावर निळी जीन्सची पॅन्ट व निळा शर्ट होता. त्याच्या उजव्या कानाजवळ मस आहे. चार सप्टेंबर २०१२ रोजी तो सकाळी घरातून निघून गेला आहे. त्याला हिंदी मराठी व इंग्रजी या भाषा येतात असे त्यात नमूद केलेले आहे.

दरम्यान त्याचे वडील जावेद खान यांची भेट घेतली तेव्हा ते खचून गेलेले दिसले. कालपासून डोळ्याला डोळा लागला नाही असे त्यांनी सांगितले. ते नांदेडच्या एसटी खात्यात डेपो मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांचा मोठा मुलगा अॅडव्होकेट टी. जे पठाण औरंगाबादच्या हायकोर्टात वकीली करतो. त्याच्या पाठचा मुलगा नांदेडमध्ये आयडीबीआय बॅँकेत आहे तिसरा मुलगा इम्रान नांदेडला प्लॉट विक्री करीत होता. चौथा औरंगाबादच्या आझाद कॉलेजमध्ये काही दिवस प्राध्यापक होता सध्या तो नांदेडमध्येच राहातो. एकूणच जावेदखान यांचे कुटुंब सुशिक्षित आणि इतरांत मिसळणारे आहे.

इम्रानचे दहावीपर्यंतचे शिक्षण तामसा तालुका हदगाव येथील राहत्या गावी असलेल्या शाळेत झाले. पुढे तो यशवंत कॉलेजमध्ये शिकला. बारावीनंतर शिक्षण सोडले व तो काही काळ बेरोजगार होता नंतर प्लॉटविक्रीचा व्यवसाय करू लागला. त्याने अनेकांना पीरबुऱ्हानगरमध्ये भूखंड विकले आहेत. इम्रानचे साडेचार वर्षांपूर्वी लग्नही झालेले आहे. त्याला पत्नी चार वर्षांचा व दीड वर्षांचा असे दोन मुलगे आणि तीन महिन्यांची मुलगी आहे. त्याचे सर्व जातीधर्माचे मित्र होते पण अलीकडे आसदखान सय्यद फिरोज या मित्राच्या सहवासात आला आणि ते व त्यांचा मार्ग आपल्याला कुठे घेऊन जात आहेत हे न कळाल्याने तो या भरकटला. त्याच्या कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील पण त्याच्या कृतीने आमच्या कुटुंबाची समाजात मान खाली गेली आहे. आमची भूमिका पोलिसाना व तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचीच राहील असे इम्रानचे वडील व भाऊ सांगत होते.

दरम्यान शुक्रवारी विभागीय पोलिस अधिकारी निर्मला देवी व एटीएसचे नांदेड येथील अधिकारी बेंद्रे यांनी इम्रानच्या कुटूंबीयांची सखोल चौकशी केली. इम्रान राहत असलेल्या खोलीची झडती घेतली असता त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही मात्र दोन ध्वनीफिती (कॅसेट) पोलिसांनी जप्त केल्या. आमच्याकडे सर्व धर्माचे साहित्य आहे असेही जावेद खान म्हणाले.
==========================

असदच्या भावाची "एटीएस'ने केली कसून चौकशी
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 13, 2012 
औरंगाबाद - पुणे साखळी बॉंबस्फोटाच्या दहशतवादी घटनेप्रकरणी तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर आणि त्यांचे पुणे; तसेच मराठवाड्यात संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर औरंगाबादच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आरोपींच्या स्थानिक दुव्यांचा कसून शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकरणातील आरोपी असदच्या भावाला "एटीएस'ने गुरुवारीच चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी करून त्याला रात्री उशिरा थेट घरात नेऊन सोडण्यात आले. 

पुण्यात झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणात तिघांना अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (ता. 11) जाहीर केले. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये असदखान जमशेद अली कायमखानी (नायगाव, जिल्हा औरंगाबाद), इम्रानखान (नांदेड) आणि सय्यद फिरोज ऊर्फ हमजा (पुणे) यांचा सामावेश आहे. यातील असदखान हा औरंगाबाद तालुक्‍यातील नायगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळताच "एटीएस'चे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास असदच्या घराची झाडाझडती घेतली. अडीच ते तीन तास झडती घेतल्यानंतर त्याचा भाऊ हुसेनखान याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. याशिवाय घरातील काही कागदपत्रे आणि आक्षेपार्ह वाटणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. रात्री हुसेन खान याची कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून विविध पद्धतीने माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्याला उशिरा त्याच्या घरी नेऊन सोडण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. मात्र, या चौकशीबाबत अधिक माहिती देण्यास "एटीएस'च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. आणखीही विविध मार्गांनी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
==========================

इम्रानच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून कसून चौकशी
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 13, 2012 



नांदेड - मूळचा तामसा येथील. परंतु वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने नांदेडातील पीरबुऱ्हाणनगरात स्थायिक झालेल्या इम्रानखान या तरुणाला दिल्ली पोलिसांनी दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या आरोपावरून गुरुवारी (ता. 11) अटक केली. इकडे नांदेडात दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत काय, याचाही तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची फिर्याद सोमवारी (ता. एक ऑक्‍टोबर) दिली. 

गुरुवारी दिल्ली पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. पैकी इम्रानखान हा नांदेडचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून स्फोटके व शस्त्रे जप्त करण्यात आली. या कारवाईने मराठवाड्यात खळबळ उडाली. महिनाभरापूर्वीच नांदेडमधून चार संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यात महंमद इलियास, मुजम्मील, महंमद इरफान, सादिक या चौघांना नांदेड येथून तर नांदेडचाच रहिवासी असलेल्या महंमद अक्रम याला बंगळूरू पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईने पोलिस प्रशासन ढवळून निघाले आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत इम्रान हा नांदेडचा आहे हे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी दुपारपासूनच दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली. इम्रानच्या वडिलांनी गुरुवारी विमानतळ पोलिस ठाण्यात एक फिर्याद दिली असून त्यात इम्रान हा ता. चार सप्टेंबर 2012 ला सकाळी घरातून निघून गेला तो अद्याप परतलाच नसल्याचे म्हटले आहे. सर्व नातेवाइकांकडे आणि त्याच्या मित्रमंडळीकडे शोध घेतल्यानंतरही त्याचा पत्ता लागला नाही, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

इम्रान काय करतो, तो खरेच दहशतवादी कारवायात सहभागी आहे का, त्याचा दहशतवाद्यांशी संपर्क केव्हा व कसा आला, याबाबत त्याच्या नातेवाइकाकडून काहीही माहिती मिळत नाही. दरम्यान, इम्रान हा सौदीअरेबियात गेला होता. तिथेच त्याचा संपर्क दहशतवाद्यांशी आला असावा, असा कयास आहे. इम्रानला अटक झाल्यानंतर नांदेडच्या दहशतवादी पथकाने गुरुवारी दुपारी व रात्री त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या नातेवाइकांचीही चौकशी केली. पण, त्यातून काही निष्पन्न झाले नाही, असे समजते. नातेवाइकांची चौकशी केल्यानंतर आता एटीएसचे अधिकारी त्याच्या साथीदारांचा शोध करीत आहेत. सलग दोन महिन्यांतील या दोन घटनांमुळे नांदेडमध्ये संशयितांच्या संख्येत भरच पडत चालल्याचे स्पष्ट होत असून अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. 

कायद्याचे शिक्षण न घेता.. 
इम्रानखान हा येथील यशवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. 1996 ते 98 या दोन वर्षांच्या काळात तो येथे शिकत होता. येथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने औरंगाबादच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु हा अभ्यासक्रम पूर्ण न करता तो गुन्हेगारी जगताकडे वळला. इम्रानचे मराठी, हिंदीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्याचे वडील राज्य परिवहन महामंडळात आगार प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. इम्रानला तीन भाऊ असून त्यापैकी समीररखान हा नांदेड येथे बॅंकेत, तैवरे औरंगाबाद येथे न्यायालयात वकील आहेत. तौफीक हा तिसरा औरंगाबाद येथेच वास्तव्यास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा