http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16525396.cms
=======================
http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0/154079
गणपती देव कसा?: झाकीर नाईक यांची मुक्ताफळेSep 24, 2012, |
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
देशभरात गणेशोत्सव भक्तीभावाने , आनंदाने आणि शांततेत साजरा होत असतानाच गणपतीबद्दल वादग्रस्तवक्तव्ये करून इस्लामचे प्रचारक डॉ . झाकीर नाईक यांनी वादाची काडी टाकली आहे . ' गणपती देव कसा असूशकतो . तो देव असेल तर ते सिद्ध करा ,' अशी मुक्ताफळे नाईक यांनी उधळली आहेत .
' पीस ' या खासगी चॅनेलवर डॉ . झाकीर नाईक हे इस्लामचा प्रचार करतात . मात्र इस्लामचा प्रचार करताना तेअनेकदा अन्य धर्मीयांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करतात . आताही त्यांनी हेच केले आहे . सोशल साइटवरीलफेसबुक अकाऊंटवर भावना दुखावणारा मजकूर टाकून त्यांनी वाद ओढवून घेतला आहे . ' गणपती कोण आहे ?त्याच्या जन्माचे रहस्य काय असे सवाल त्यांनी केले आहेत . गणपती देव असल्याचे कुणी सिद्ध केल्यास मी प्रसादभक्षण करेन , असेही त्यांनी म्हटले आहे . इतकेच नव्हे तर ' जर तुमचा देव स्वत : च्या मुलाला ओळखू शकत नाहीतर तो मी संकटात आहे हे कसे ओळखणार , अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे .
डॉ . नाईक यांच्या या प्रतापामुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . नाईक यांच्या फेसबुक अकाऊंटवर बंदीघाला , अशी मागणी केली जात आहे .

तुमचा गणपती देव आहे का? - डाँ. झाकीर
Monday, September 24,
‘पीस’ चॅनलवरून इस्लाम धर्माचा प्रचार करणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याने ऐन गणेशोत्सवात गणरायांनावरच प्रश्न उपस्थित केला आहे. गणपती देव असल्याचे सिद्ध करा, अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्य झाकीर नाईक याने फेसबुकवर केले आहे. डॉ. नाईक यांच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. झाकीर याच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
फेसबुक या सोशल साइटवर असलेल्या आपल्या अकाऊंटमध्ये त्याने गणपती बाप्पा आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. गणपती कोण आहे, गणपतीच्या जन्माचे रहस्य काय असे प्रश्नप त्याने केले आहेत. गणपती देव असल्याचे सिद्ध केल्यास मी प्रसाद भक्षण करेन.
एवढेच नाही तर ‘जर तुमचा देव स्वत:च्या मुलाला ओळखू शकत नाही, तर तो मी संकटात असल्याचे कसे ओळखणार’ अशाप्रकारचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे फेसबुकवरील अकाऊंट बंद करण्याची मागणी होत आहे. मुस्लिम बांधवांना सहिष्णुतेचे डोस पाजणारा डॉ. झाकीर नाईक हा इस्लामी जगतात विचारवंत म्हणून ओळखला जातो.

-=====================
http://www.saamana.com/2012/September/24/Link/Main1.htm
गणपती देव असल्याचे सिद्ध करा!
ऐन उत्सवात फेसबुकवर गणरायाची विटंबनाडॉ. झाकीर नाईक याचे हिरवे फूत्कार हिंदूंमध्ये संतापाची लाट जर तुमचा देव स्वत:च्या मुलाला ओळखू शकत नाही, तर तो मी संकटात आहे हे कसे ओळखणार? मुंबई , दि. २३ (प्रतिनिधी) - ‘पीस’ चॅनलवरून इस्लामचा प्रचार करणार्या डॉ. झाकीर नाईक याने ऐन गणेशोत्सवात गणरायाची विटंबना केली आहे. गणपती देव असल्याचे सिद्ध करा, असे हिरवे फूत्कार त्याने फेसबुकवर सोडले आहेत. डॉ. नाईक याच्या उद्दामपणामुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ‘पीस’ या खासगी चॅनलवरून डॉ. झाकीर नाईक हा हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकत असतो. फेसबुक या सोशल साइटवर असलेल्या आपल्या अकाऊंटमध्ये त्याने गणरायाची विटंबना करणारा मजकूर टाकला आहे. गणपती कोण आहे, गणपतीच्या जन्माचे रहस्य काय असे प्रश्न त्याने केले आहेत. गणपती देव असल्याचे सिद्ध केल्यास मी प्रसाद भक्षण करेन, अशी उद्दाम भाषा त्याने वापरली आहे. एवढेच नाही तर ‘जर तुमचा देव स्वत:च्या मुलाला ओळखू शकत नाही, तर तो मी संकटात असल्याचे कसे ओळखणार’ अशा अश्लाघ्य शब्दांत गणपतीच्या जन्माची खिल्ली उडवली आहे. डॉ. झाकीर नाईक याच्या या उद्धटपणामुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे फेसबुकवरील अकाऊंट बंद करण्याची मागणी होत आहे. ‘पीस’ या चॅनलवरून मुस्लिमांना सहिष्णुतेचे डोस पाजणारा डॉ. झाकीर नाईक हा इस्लामी जगतात विचारवंत म्हणून ओळखला जातो. वादग्रस्त विधानांसाठी डॉ. नाईक कुख्यात आहे.
=====================
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा