http://www.islamdarshan.org/node/1164
- साने गुरूजी
मानव समाजाच्या प्रगतीची धर्माच्या बाबतीत अखंडता सतत दिसून येते. त्यासाठी संदेशवाहक पैगंबर येत. जे ईश्वरासंबंधीची कर्तव्ये पुन्हा सांगत. एकमेंकांत कसे वागावे पुन्हा शिकवीत. प्रत्येक विभूती अध्यात्मिकतेशी एकरूप होती. तेज किरण फेकणारी प्रकाशराशी होती. अधःपतित मानवसमाजाला वर नेण्यासाठी ते येत. पतिताला उद्धारायला येत. अशुद्धाला शुद्ध करण्यासाठी येत. अंधारात दिवा दाखवायला येत. अशा महापुरुषापैकीच मुहम्मद पैगंबर सलम हे होत. मुहंमदांचे आगमन केवळ अरबस्थानापुरते नव्हते. ते सर्व जगतासाठी होते. कारणत्या काळात सर्वत्रच धार्मिक अवनती झाली होती. मोझेस (मुसा), ख्रिस्त (इसा) यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणात श्रेष्ठकनिष्ठपणाची बंडे गाजली होती. सद्धर्म लोंपला होता. ख्रिश्चन धर्म आपांपसातील मतभेदांनी कत्तली करीतहोता. शांती देणारा धर्म रक्ताळलेला होत होता हिंदुस्थानाकडेही निराशाच होती. बुद्धींनी दिलेला नीतिधर्म पुन्हा नष्ट झाला. अनेक देवदेवतांचा हिंदूधर्म रुढ झाला. नाना देवतांची पुराणे रचिली जाऊ लागली. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसांत झगडत होते. शाक्तमेतपुढे येत होती. उपनिषदातील धर्म मूठभर लोंकाजवळहोता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! शिवशावी, श्रेष्ठ-निष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकार श्रद्धाशुन्य झाले.कर्मकांड वाढले. सतराशे देवदेवतांचा बुजबुजाट झाला! उच्चनीचपणाला ऊत आला. बुद्ध धर्माचे शुद्ध स्वरूप राहिले नाही. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. देशाबाहेर त्या-त्या देशांनी आपले रंग बौद्ध धर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बौद्ध धर्म कोणाला पटणार? बुद्धालाच त्यांनी देव केले! कोणी अमिताभ म्हणू लागले. कोणी कांही.
स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना भान नव्हता. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोंपला होता. अशा काळांत मुहंमद सलम आले. त्यांचेयेणे आकस्मिक नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहंमद सलम यांचं आगमन जगाच्या इतिहासाशी संबंध्द होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून जुन्या श्रद्धेचे नव्याने जन्म होणे अपरिहार्य होते. अशा चिखलातून नवीन सहस्रदल सुंदर कमल मुहंमद सलम यांच्या रूपाने फुलले. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यातील अनंत मकरंदमिळाला. अरबस्थानात मक्का येथे अरब रक्ताच्याथोर कुलात, श्रेष्ठ कुरेश घराण्यात, ते जन्मले. मक्काशहर अरबस्थानचे केंद्र होते. नीटनीटके, भरभराटलेले, समृद्ध व बळवंत शहर होते. अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यातून एक शांत स्वभावी, विचारमग्न व गंभीर व्यक्ती हिंडताना दिसे. कोणती व्यक्ती? कोण तो पुरुष? कांही तरी शोधत आहेत, कोठेतरी पाहत आहेत, अस्वस्थ आहेतते डोळे! रुबाबदार, सुंदर, सामर्थ्य संपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नाव? मुद्र शुभ्र व लाल आहे, पोषाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ, जणू वरून खाली येत आहे. देवाकडून मानवाकडे येत आहे. गंभीर मुखावर ही रस्त्यात मुले भेटताच हास्य फुलते आहे पहा. मुलांचे प्रेमी होते. कारणमुलाजवळ देवांचे राज्य असते.स्वर्गाच्या जवळ ती असतात. विचारात म्गन होऊन जरी हा पुरुष जात ्सला तरी वाटेत कोणी सलाम केला तर लगेच तो उत्तर देई. मग तो सलाम अगदीदीनदलिताचा का असेना. कोण होता तो? लोक त्यांना अल-अमीन म्हणत. आपण होऊन लोंकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्यांचे जीवन इतके आदर्शरूप, सचोटीचे, कष्टाचे सन्मान्य असे होते की, सर्वांना त्यांच्याविषयी आदर व विश्वास वांटे. हा मनुष्य धर्म सांगू लागला होता. समाजाची जुनी बंधने तो नष्ट करू पाहत होता. प्राचीन चाली, जुने दुष्ट व भ्रष्ट रीती-रिवाज सोडा असे सागंत होता. हा क्रांतिकारक आहे, असे आता लोकं म्हणत. कोण होता तो? ते कां मुहंमद पैगंबर सलम? होय, होय तेच ते. शांतपणे राहणारे. शिव्याशाप, नंदा सहन करीत जाणारे ते मुहंमद (सलम) होते. कुरेशांच्या कुलात, जन्मले होते. मुहंमदांच्या जन्मापूर्वी वडिल अब्दुल्ला प्रवासात मरण पावले. मुहंमद अनाथ जन्मले. जो पुढे सर्व अनाथांचा मायबाप झाला तो जन्मताच पितृहीन होता. इ.स. ५७० च्या ऑगस्टची २९ वी तारीख. त्यादिवशी हा महापुरुष जन्मला. आईचे नांव अमीना. परंतु तीही लवकरच मरण पावली. मुहंमद लहानपणीच पोरके झाले. मुहंमदांचे वय सहा वर्षाचे. पोरक्या मुलांची कशी दीनवाणी स्थिती होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता.ती आठवण ते कधी विसरले नाहीत. आजोबांनी मुहंमदास आपल्याजवळ घेतले. परंतु आजोबाचे प्रेम मुहंमदास मिळावयाचे नव्हते. ते आजारी झाले. आजोबांनी आपला मुलगा अबु तालीब यांस मरणशय्येवरून सांगितले, ’’हा तुझ्या भावाचा मुलगातुझ्या स्वाधीन मी करीत आहे. त्यांना प्रेम द्या.’’ आजोबा देह सोडून गेले. मुहंमदांचे वय नउ वर्षाचे होते. ते उंटांना चारायला नेत.शेळ्यामेंढ्या घेऊन जात. मुहंमद सलम आता ऐन तारुण्यात होते. कुरेश घराण्यातील एक श्रीमंत विधवा स्त्री खदिजा तिच्या मालाचे उंट घेऊन मुहंमद व्यापाराला जात. मुहंमद सलम यांची कार्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, चारित्र्य निर्दोष, सत्यमय वाणीचा खदिजावर परिणाम झाला, चाळीस वयाच्या विधवा खदिजेने,पंचवीस वयाच्या मुहंमदाला विवाहचा प्रस्ताव दिला. मुहंमदही आनंदाने लग्नास उभे राहिले. पवित्र पर्वत हिरातील एका गुहेत मुहंमद सलम प्रार्थना करीत. ध्यान करीत बसत. कांही तरी सत्य सांपडावे अशी धडपड होती. तू ईस्वराचा पैगंबर आहेस, तुझ्या प्रभूच्या नांवाने हांक मार, घोषणा कर, ईशदूत जिब्रइलने अल्लाहकडून दिव्यप्रकटन आणले. घरी येउन खदिांना सांगितले. सारे ऐकून खदिजा म्हणाली, ’’तुम्ही कधीही खोटे बोलत नाहीस. अपकाराचा बदला उपकाराने घेत नाहीस, निर्दोष व पवित्र तुमचे जीवन आहे. आप्तेष्ट, सखेसोयरे सर्वांशी तुम्ही प्रेमाने वागता. मुहंमद सलम पैगंबर आहेत, अल्लाह एक आहे यांवर तिने सर्वप्रथम इमान आणले. उठ, जगाला सत्याची सूचना दे. अल्लाहचे गौरवगान गा. त्याचे वैभव गा असा स्पष्ट आदेश मिळाला. मुहंमद (सलम) आता उभं राहिले. अचल श्रद्धेने व अपार विश्वासाने उभे राहिले. सारे छळ, यातना, हालअपेष्टा यांना न जुमानता उभे राहिले. सत्यासाठी उभा राहिलेला हा महापुरुष असत्यासमोर अतःपर नमला नाही. इस्लामला अनुयायी मिळत गेले.... प्रचारात प्रखरता आली.... मूर्तिपूजा सोडा असे जाहीरपणे सांगू लागले. (पान ६१) मूर्तिपूजेने त्या महान प्रभूचा अपराध होतो.... ही जुनी पुजापद्धती सोडा. या जगीचे सुख व परलोकीचेही सुख मिळेल... ती जळजळीत, रसरशीत वाणी होती.अल्लाशिवाय दुसरा देव नाही. अल्लाच एस सत्य असे तुम्ही म्हणणार नाही, तोपर्यंत इह वा अन्यत्र तुम्हाला तरणोपाय नाही.... ना ऐकाल तर पुढे विनाश आहे. कोणी वाचणार नाही. तो शेवटचा दिवस येईल. सर्वांचा हिशेब होईल. नरकाची आग एकीकडे, दुसरीकडे अनंत निर्मळ सुखांचा स्वर्ग. काय पाहिजे बोला. सत्य धर्म ऐका.... ती ईश्वरी शासनाची भयंकर वर्णने ऐकून श्रोत्यांचा थरकांप होई. विरोधकांकडून मुहंमदांचा अकारण छळ सुरू झाला..... मुहंमदांच्या धर्माची शिकवण लोकशाही स्वरूपाची होती. मुहंमदांच्या ईश्वरासमोर सारे सारखे होते. प्राचीन विशिष्ठ भेद ते श्रेष्ठ कनिष्ठपणाचे प्रकार मुहंमद सलम नष्ट करू पाहत होते. सनातन्यांना हे कसे सहन होणार? एकमेंव देवाची पूजा सुरू झाली तर या प्रतिष्ठितांची पूजा कोण करणार? ज्यांच्या घरात कोणी नवधर्मी होते, त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी तुरुंगात टाकले. त्यांची उपासमार सुरू झाली. त्यांना काठ्यांनी बदडले. रमधा टेकडी व बथा ही जागा या छळासाठी प्रसिद्ध झाली! जे पुरुष नवधर्म घेत त्यांना प्रखर उन्हात तप्त वाळूत उताणे निजवीत. उघडेकरून निजवीत. छातीवर दगड ठेवीत. पिण्यास पाणी देतनसत. ’मुर्तिपुजा मान नाही तर मर’ असेम्हणत. पुष्कळजण या छळातही टिकत..... मुहंमद सलम हे छळ पाहत होते. त्यांच्या हृदयाची कालवाकालव होत होती. एकीकडे असे छळ चालले असता दुसरीकडे मोठी मोठी अमिषे दाखवून मुहंमदास वश करून घेम्याचे प्रयत्न चालले होते. एकेदिवशी विरोधकांपैकी जरा नेमस्त वृत्तीचे एक गृहस्थ त्यांच्याजवळ येत म्हणाले, ’’तुझ्यासमोर एकयोजना ठेवायला मी आलो आहे. बघ तुला पटली तर.’’ ऐक या नवधर्माचा मुख्य होउन तुला का श्रीमंत व्हायचे आहे? तसे असेल तर तुला अधिक श्रीमंत होता येइल इतकी संपत्ती गोळा करून देतो. तुला मानसन्मान पाहिजे असेल तर तुला आमचा नायक आम्ही करतो. तुला राज्य पाहिजे असेल तर आम्ही तुला आमचा राजा करतो. उत्तरादाखल मुहंमद सलम म्हणाले, तर मग माझे आता ऐका. त्या परमदयाळु अल्लाची शपथ घेउन मी सांगतो की, मी जेसांगत आहेती त्या प्रभूचीच शिकवण आहे. प्रभूने जे पुस्तक (कुराण) मला दिले तेच मी सांगतो. कुराणात सज्जनांना आशा आहे, दुर्जनांना शिक्षा आहे. तुमचा ईश्वर एक आहे असे ज्ञान मला झाले आहे. म्हणून त्या एका ईश्वराकडे तुम्ही सर्व चला. जे पूर्वीचे झाले त्याची क्षमा मागा. मुर्तिपूजा सोडा. ठरीव भाग गरिबासाठी दान द्या. जे परलोंकावर विस्वास ठेवणार नाहीत, त्यांचे भले होणार नाही. परंतु जे विश्वास ठेवतील, श्रद्धापूर्वक कर्तव्ये करतील, त्यांना अमर बक्षीस मिळेल. पुढे मुहंमद म्हणाले, ’’आजोबा, ऐकलेत का? आता योग्य ते करा.’’ (संकलक - एम. एम. लांडगे) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा