http://muslimjagat.blogspot.in/2011/08/blog-post_10.html
Dhanyawad.
Ramesh Shinde
Visit www.hindujagruti.org
--
visit @
http://divyamarathi.bhaskar.com/
www.psiddharam.blogspot.com
पुरुषोत्तम खेडेकर - नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख
| ||
| ||
Ramesh Shinde
Visit www.hindujagruti.org
--
visit @
http://divyamarathi.bhaskar.com/
www.psiddharam.blogspot.com
==================================
पुरुषोत्तम खेडेकर आणि...
| ||
| ||
महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनासाठी झटणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यांचे मोहोळ मानले जाते. राज्यात फुले-आंबेडकरी विचारांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. सामाजिक न्याय, लोकप्रबोधन, अत्याचार निवारण, शिक्षण, पुनर्वसन आदी क्षेत्रात या संघटना काम करतात. बहुजन समाजातील नानाविध प्रश्न ऐरणीवर आणून काम करणाऱ्या या संघटना विविध समाजघटकांत पाय रोवून उभ्या आहेत. या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी संघ आदींचा बराच बोलबाला आहे.
माध्यमातील दहशतवाद, पृ. ११) आपण फुले-आंबेडकरवादी असल्याचाही दावा खेडेकर करीत असतात. (शिवधर्म प्रेरणा व ब्राह्मण जेम्स लेन, पृ. १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात वावरलेल्या दादासाहेब रूपवते यांचे वकील पुत्र अॅड. संघराज रूपवते यांच्याबद्दल खेडेकर म्हणतात, ''अॅड. संघराज रूपवतेंनी आंबेडकरी चळवळ हे नाव वापरून आंबेडकरांच्या मोठेपणाला आपल्या विकृतीची झालर लावू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक व जागतिक व्यक्तीत्त्व आहे. त्यांचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे. ते केवळ महार व नवबौद्धांच्याच मालकीसाठी नाही. मराठा सेवा संघाचे कार्यही आंबेडकरवादी आहे. बहुजन विघटनाला वा विकृतीला आंबेडकरांनी मान्यता दिलेली नाही. अॅॅड. रूपवते यांनी आपली विकृती बाबासाहेबांच्या वटवृक्षाखाली लपवू नये. त्यांनी जेम्स लेनचे हे पुस्तक पूर्णपणे वाचले आहे. पारायणे केली आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायास व आदर्शास स्मरून कोणते अगाध ज्ञान प्राप्त केले त्याचा हिशोब आम्हा आंबेडकरवाद्यांसमोर प्रामाणिकपणे मांडावा.'' (शिवधर्म प्रेरणा, पृ.११, १२) यातून ते आणि त्यांची संघटना आंबेडकरवादी असल्याचा खेडेकरांचा दावा स्पष्ट होतो. खेडेकर एक व्यक्ती म्हणून व त्यांची संघटना एक स्वतंत्र संघटना म्हणून काय करतात याच्याशी आम्हाला फारसे देणेघेणे नाही. मात्र अांबेडकरवादी खेडेकर आणि अांबेडकरवादी मराठा सेवा संघ जर काही लिहीत असतील, कृती करीत असतील आणि त्या जर अांबेडकरवादाच्या विपरीत असतील तर त्याची दखल घेऊन त्याचे अॉडिट करणे आम्हा चळवळवाल्यांचे कर्तव्य बनते.
झडल्या. त्यातून बहुजनांमध्ये जागृतीच्या लाटा उसळल्या. चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात. ते म्हणतात, ''अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे समाज व्यवस्था नाकारणे, देश व गावगाडा नाकारणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न स्त्री-पुरुष एकत्र येऊन संभोग क्रीडा करणे अशा बाबीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही मागणी म्हणजे राज्यघटना रद्द ठरवून पुन्हा मनुस्मृतीच लागू करावी या प्रकारची आहे.'' ( शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४, ८) डॉ. आंबेडकरांच्या या लाडक्या कलमाविरुद्ध कुऱ्हाड चालवणारे खेडेकर 'आंबेडकरवादी' असल्याचे सांगत असतील तर त्यांची कथनी आणि करणी यातील विसंगती चळवळीने ओळखली पाहिजे. मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले होते, म्हणूनच ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भारतीय घटनेचे निर्माते असलेले बाबासाहेब स्वीकारणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच, तथापि त्याचा अतिरेक टाळावा असे खेडेकरांनी म्हटले असते तर समजण्याजोगे होते.
त्यांना पोलिसांच्या आणि तुरुंगाच्या सापळ्यात अडकवणारा मार्ग आहे. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने त्याच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांची बदनामी केली आहे. त्याच्या या दुष्टाव्यामुळे सारेच भारतीय दुखावले गेलेत. सर्व भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या या नतद्रष्ट माणसाला खेडेकरांनी त्यांचे दादोजी कोंडदेवांवरील पुस्तक अर्पण केले आहे. खेडेकरांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये जेम्स लेनचे आभार मानलेले आहेत, हा प्रकार म्हणजे भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. मधुकर रामटेके, संजय सोनवणी, भूपाल पटवर्धन आणि हरी नरके यांनी श्याम सातपुतेंना साथ द्यायचे ठरवले. १८ मे २०११ रोजी आंबेडकरवादी चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते अशोक धिवरे, सहआयुक्त, पुणे पोलीस यांना भेटून लेखी अर्ज व खेडेकरांच्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकाची प्रत सादर केली. पोलिसांनी योग्य ती छाननी आणि शहानिशा करून सुमारे ३ आठवडय़ांनी खेडेकरांवर गुन्हा दाखल केला. ''प्रशिक्षित मराठा युवकांनी पुढाकार घेऊन देशात धार्मिक व जातीय दंगली घडवून आणल्या पाहिजेत, तरच समाजात सुधारणा, क्रांती व परिवर्तन शक्य आहे. हिटलरशाहीप्रमाणेच ब्राह्मण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा कोरावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापून वा जाळून मारावेच लागतील. महाराष्ट्रासह भारत देश 'निब्र्राह्मण' करावा लागेल. हेच खरे शिवप्रेम, हेच खरे शिवकार्य. आज छत्रपती शिवराय पुन्हा आल्यास हेच कार्य करतील.'' (पृ. ५४, ५५) असा थेट चिथावणीखोर मजकूर खेडेकरांनी लिहिलेला आहे.
कुरुंदकर, बाळकृष्ण रेणके, डॉ. सदानंद मोरे, प्रा. आ. ह. साळुंखे, प्रा. उषा वाघ, प्रा. अंजली आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर आणि इतर अनेकांविरुद्ध मोहीम उघडण्यात आल्या. अत्यंत भडक, धादांत खोटय़ा, चिथावणीखोर आणि विकृत हेडलाइन्स देण्यात आल्या. पानभर मजकूर, अग्रलेख, लेख यांचा भडिमारच करण्यात आला. सगळे वृत्तपत्रीय संकेत पायदळी तुडवून पुन्हा-पुन्हा एकतर्फी अर्धसत्य मजकुरांचा मारा करण्यात आला. कोणाचाही खुलासा छापण्यात आला नाही. फॅॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी तसेच व्यक्तिगत वैमनस्य करणाऱ्या असतात, याचा प्रत्यक्ष अनुभव चळवळीतील लोकांना येत गेला. डिवचणाऱ्यांनी डिवचत रहायचे आणि डिवचले जाणाऱ्यांनी गप्प रहावे, अशी अपेक्षा बाळगायची हा प्रकारच क्रूरतेच्या पातळीवर जाणारा आहे. ही कोंडी आणि हे अपमानकारक डिवचणे किती काळ पचवून घ्यायचे? पुस्तिका, पुस्तके, प्रचारपत्रके, उस्मानाबाद, अमरावती, नाशिक येथील खोटय़ा पोलीस तक्रारी यांचा उच्छाद मांडण्यात आला. शेवटी चळवळीतील लोकांच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात. वारंवार विनवणी करूनही हा भडिमार थांबला नाही. अत्यंत गलिच्छ पत्रे पाठवून आणि खेडेकरांच्या फेसबुकवरील 'शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच'च्या माध्यमातून बदनामी, धमक्या आणि शिवीगाळीचा वर्षांव चालूच राहिला. शेवटी भारतीय राज्यघटनेने चळवळीतील लोकांनाही आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे.
पुढे म्हणतात, ''रामदासाने आदिलशहासमोर शपथ घेतल्याप्रमाणे जिजाऊ, शिवराय, संभाजी व राजाराम यांचे खून केले.'' (महाराज माफ करा, पृ. २५) ''श्रीकृष्ण हा स्त्रीउद्धारक होता.. श्रीकृष्ण हा समतेचे, न्यायाचे प्रतीक आहे. तर विष्णू हा विषमतेचे, अन्यायाचे प्रतीक. श्रीकृष्ण बहुजनांचा तर विष्णू ब्राह्मणांचा! जातिनिर्मूलनासाठी श्रीकृष्णाने सर्व जातबांधवांच्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला तयार केला'' (मराठय़ांचे रामदासीकरण, पृ. १९) असे खेडेकरांचे संशोधन आहे. रिडल्स ऑफ राम अॅण्ड कृष्ण लिहिणाऱ्या आणि रामकृष्णांचे गौडबंगाल उलगडून दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी खेडेकरांची ही मते काडीमात्र जुळत नाहीत. किंबहुना ती पूर्णपणे विरोधात जातात. तरीही खेडेकर आंबेडकरवादी आहेत असे कसे म्हणायचे? शिवरायांनाही वेठीला धरताना शिवरायांच्या तोंडी ते चक्क काल्पनिक मजकूर घालतात. ते म्हणतात, ''शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टाने महाराजांना प्रायश्चित्त घेण्यासाठी यज्ञ करावा लागेल असे सांगितले. तेव्हा महाराजांना त्यांनी प्रत्येक ब्रह्महत्येमागे आठ हजार होन दक्षिणा मागितली. महाराज म्हणाले, 'ब्रह्महत्या म्हणून प्रत्येकी आठ हजार होन द्यायला मी तयार आहे. पण एक करा, सध्या जिवंत असलेल्या भटांचीही मोजणी करा, त्यांनाही संपवून टाकू. त्याबद्दल प्रत्येकी आठ हजार होन देऊन टाकू. गागाभट्ट चरकला. महाराजांचे हे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी शिवभक्तांवर येऊन पडली आहे. त्यासाठी शिवभक्तांनी तयार राहावे.'' (ब्राह्मण राष्ट्राचा बुरखा हिंदू राष्ट्र, पृ. १९) असे खेडेकरांचे हिंसक प्रतिपादन आहे. यातून हे स्पष्ट होते की, खेडेकर बिनदिक्कतपणे शिवरायांना वेठीला धरून स्वत:च्या हिटलरी विचारांचा प्रचार करीत आहेत.
प्रा. हरी नरके
(भाग २)
करणारे हरिभाऊ नरके हे सुमारे गेले चार वर्षे मराठा जातीचा ओबीसीत समावेश करणे कसे अन्यायी आहे यावर राज्यात व राज्याबाहेर भाषणे देत आहेत.'' (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५३) अशी टीका खेडेकर करतात. मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक मुद्दे दुबळ्या ओबीसी-भटक्यांना समजावून सांगणे ही हरि नरके यांची कृती मराठा समाजाची िनदा-नालस्ती कशी ठरते ते खेडेकरच जाणोत. घटनात्मक पातळीवरील मतभेद मांडायचे नाहीत काय? मतभेद मांडणे म्हणजे शत्रू होणे असते काय? त्यासाठी ठेचून काढू, संपवून टाकू अशा धमक्या देणे हा चळवळीत साथ देणाऱ्यांचा हा विश्वासघात नाही काय? इथे कुठे आला ब्राह्मण? आम्ही जिवंत राहण्याची धडपड करणे हीही तुम्हाला ब्राह्मणी खेळी वाटत असेल तर ती तुमची गरसमजूत आहे. आमचा मात्र तो हक्क आहे. ब्राह्मणवादी संघटनांच्या अजेंडय़ाशी आम्ही सहमत होणे कदापिही शक्य नाही. आजही त्यांना कुळकायदा रद्द करायचा आहे. आरक्षण आणि जातवार जनगणनेला त्यांचा विरोध आहे. आजही जे ज्ञानगंडाने मातलेले आहेत, परशुराम ज्यांचा आदर्श आहे, हिटलर ज्यांना अनुकरणीय वाटतो, त्यांच्याशी आमची हातमिळवणी होऊ शकत नाही. त्यांचे आणि खेडेकरांचेच एकमत आहे. कारण खेडेकर म्हणतात परशुराम हा मराठा होता. (पृ. ३७) एवढेच नाही तर त्यांचे असेही प्रतिपादन आहे की ''मराठय़ांच्या वीर्यसंकरातून आज जगातील मानववंश वाढलेले आहेत.. वैद्यकीय व शास्त्रीयदृष्टय़ा मराठय़ांचा संकर होऊन निर्माण झालेला आजच्या ब्राह्मण समाजाचा बाप मराठाच आहे हे जगत्सत्य आहे.'' (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) यावरून मराठा आणि ब्राह्मण हे एकच आहेत आणि त्यांच्यातील भांडणं ही भाऊबंदकीच आहे असे खेडेकरांचे मत आहे. असे असेल तर या भांडणाशी दलित-ओबीसींचा कुठे संबंध येतो?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा