शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

इस्लाम जिहाद करण्याचा आदेश देतो

http://www.islamdarshan.org/node/511


इस्लाम जिहाद करण्याचा आदेश देतो. पूर्वी ही तलवार इस्लामच्या प्रचाराची एकमेव शक्ती होती व आजही आहे.

जिहाद शब्दाचा अर्थ जवळपास ‘निकरीचे प्रयत्न’ असा होतो. मनुष्य ज्याक्षणी इस्लाम धर्मात प्रवेश करतो त्याक्षणी त्याचा जिहाद सुरु होतो. इस्लाम धर्म स्वीकारणे म्हणजे बर्‍याच सुखांचा त्याग करुन बर्‍याच नात्यासंबंधापासून तुटून वेगळे होणे. इस्लाम स्वीकारताच ईश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याची अपेक्षा केली जाते. एका बाजूला मनुष्याचे मन त्याला स्वार्थ व इच्छापूर्तीकडे ओढत असते, तर दुसर्‍या बाजूने कुटुंबियांतील सदस्य सुख-समृध्दि करिता या न त्या मार्गाने जास्तीत जास्त धनार्जन करण्याचा आग्रह करीत असतात. तर तिसर्‍या बाजूने नात्या-गोत्यातील लोक स्वार्थासाठी पारंपारिक रुढींचा अवलंब करण्याची गळ घालतात. तर चौथ्या बाजूने समाज व शासन नियम व निर्बंधाचे दडपण घालीत असतात. मुसलमानास या सर्व ओढाताणीत ईश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याचे व त्याला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करावे लागते. ही सारी कृत्य जिहादमध्ये गणली जातात. जिहाद म्हणजे ईश्वराच्या आज्ञेचे पालन करतांना निर्माण होणार्‍या सर्व अडथळ्यांशी झुंज देऊन ईश्वरास प्रसन्न करण्याच्या मार्गाचा अवलंब होय. मात्र असे करतांना सर्व लोकांशी सहानुभूति, नम्रता, प्रेम व आपुलकीचा व्यवहार करुन त्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत राहिले पाहिजे, जेणेकरुन सर्व लोक त्याला सहकार्य करु लागतील.
मात्र इस्लाम धर्मांचे शत्रू एकत्र येऊन इस्लाम धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतील तर इस्लामच्या आदेशानुसार संख्या बळाची चिता न करता, तसेच आपल्या शस्त्रशक्तीचा विचार न करता, अडथळे व अडचणींना न जुमानता ईश्वराच्या मदतीच्या विश्वासावर इस्लाम-विरोधी तत्वांवर हल्ला करुन त्यांच्या मनोबलाचा चुराडा करुन टाकावा व इस्लामच्या विजयाची पताका फडकवून विजयश्री प्राप्त करावी, ही जिहादची अंतिम व सर्वोच्च शर्त आहे. असे प्रयत्न करतांना मृत्यु आल्यास शहादत (वीरगति) प्राप्त झाल्याचे मानले जाते. वीरगति मिळाल्याने कर्जाव्यतिरिक्त सर्व गुन्हे माफ केले जातात व ईश्वर प्रसन्न होतो.
इस्लामचा प्रसार तलवारीच्या शक्तीने केला गेला आहे, या विधानाबाबत बोलायचेच झाले तर ही बाब बर्‍याच अंशी गैरसमजावर तर कांही अंशी इस्लाम धर्माच्या ज्ञानाच्या अभावावर आधारलेली आहे. इस्लाम हा स्वाभाविक धर्म असून संपूर्ण मानव समाजाचा त्यावर हक्क आहे. हा परिपूर्ण जीवन मार्गदर्शक धर्म आहे. यात मानवी जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण केले गेले आहेत. इस्लाम मानवतेची सर्वथः रचनात्मक प्रगतीची अपेक्षा करतो. न्याय, बंधुत्व, एकता, सहकार्य व मित्रत्व एवढेच नव्हे तर इस्लाम द्वारा सर्व प्रकारच्या मानवी व नैतिक मूल्यांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला जातो. अत्याचार, अनाचार, दुष्कृत्य, शत्रूत्व, कृतघ्नता व विनाकारण रक्तपात इस्लामला अमान्य आहे.
विनाकारण होणार्‍या हत्येबाबत कुराणात म्हटले आहे की एका निरपराध माणसाची हत्या म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या होय. यावरुन असे सिध्द होते की इस्लाम लोकांच्या प्राण, वित्त, अब्रू (शील) व सम्मानाची सुरक्षा करतो. सर्वत्र शांती व सुरक्षेचे वातावरण निर्माण करु इच्छितो. पण एखादा अत्याचारी लोकांच्या अब्रूशी खेळत असेल वा शांति व सुरक्षेचे वातावरण नष्ट करीत असेल किवा मानवतेवर जुलुम व अत्याचार करत असेल तर अशावेळी इस्लाम अन्याय व अत्याचाराविरुध्द जिहाद करण्याचा आदेश देतो.
इस्लाममध्ये जिहादचे कांही नैतिक मापदंड आहेत. कांही मर्यादा व बंधने आहेत. त्या मर्यादा व नियमांचे पालन करुनच जिहाद करण्याचे इस्लाम आदेश देतो. या मर्यादांचे कधीच उल्लंघन केले गेले नाहीं. मात्र तलवार इस्लामची एकमेव शक्ति आहे, हे विधान चुकीचे आहे. उलट तलवार उगारण्याची परवानगी विशिष्ट परिस्थितीतच दिली गेली होती, व तसे करतांना इस्लामी तत्व व नैतिकतेचे पूर्णपणे पालन करण्यांत आले होते. इस्लामच्या इतिहासात झालेली सारी युध्दे अत्याचाराविरुध्द लढली गेलीत व ती सर्व मानवतेच्या संरक्षणार्थ होती. संपूर्ण मानव जातीच्या इतिहासात ज्याप्रमाणे नैतिक मूल्यांचे पालन करुन इस्लामच्या सुरवातीच्या पर्वात जसे युध्द अंमलात आलेत तशा प्रकारच्या युध्दांचे इतरत्र कुठेच उदाहरण देता येणार नाही. त्या इस्लामी युध्दांत कोणतेच गैरइस्लामी वा अनैतिक मार्ग अवलंबिल्याचे निदर्शनास येत नाहीत.
इस्लाम शक्यतो युध्द व रक्तपात टाळण्याचा प्रयत्न करतो. पण युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर तलवारीने इस्लामची मानवी नैतिकता पूर्णपणे कार्यान्वित केली जाते. इस्लाम सर्व सामान्यांचा अर्थात् संपूर्ण मानव समाजाचा धर्म आहे. यात कोणीही सामान्य नाहीं की खास नाही. हा अगदी सोपा धर्म असून याची प्रार्थनेची पध्दतही अगदी सोपी व आकर्षक आहे. जगाच्या इतर चुकींच्या पध्दतिंना या धर्मात जागा नाहीं. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर जीवन प्रकाशमान होते. जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण होते. मरणोपरांत जीवन सफल होते. हीच या धर्माची विशेषता आहे व याच कारणामुळे जगाने या धर्माचा स्वीकार केला आहे. आज ही या धर्माच्या परिधीचा विस्तार होत आहे. प्रश्न आहे तो तलवारीच्या एकमेव शक्तीचा. तुम्ही स्वतः भारताच्या इतिहासाकडे लक्ष द्या. या देशात धर्मप्रचाराकरिता कोणतेच युध्द झालेले नाही. पण आपण पाहतोच की भारतात मुसलमानांची लोक संख्या १५ कोटीच्या आसपास आहे.
ही लोकसंख्या युध्दविना निर्माण झाली आहे. इस्लाम धर्माची हेच वास्तविक उदाहरण आहे. या धर्माच्या उदात्त तत्वांमुळे लोक या धर्माकडे धावत येतात व धर्माचा स्वीकार करतात. अहिसेबाबतची योग्य शिकवणूक म्हणजेच अहिसेचा पाया होय. इस्लाम शांतिचा संदेश आहे. इस्लामचा उद्देश आहे की देश व देशातील सर्व नागरिकांनी शांति व सुरक्षेच्या वातावरणात निश्चित होऊन सुखी जीवन जगावे. शांति व अहिसेच्या इस्लामी तत्वांच्या तुलनेत आजच्या अहिसेची परीभाषा फोल ठरते. अत्याचारी व जुलुमी माणसाचा जुलुम सहन करीत राहावे व त्याचा विरोध करण्यात येवू नये अशी जर अहिसेबाबत भूमिका असेल तर ती मानवी जीवनाकरिता निश्चितच निरूपयोगी व निरर्थक ठरेल या विपरित इस्लाम खर्‍या अर्थाने शांती व सुरेक्षेचे वातावरण कायम करु पाहत आहे. अत्याचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी इस्लाम धर्मीय कोणत्याही टोकाची भूमिका घेण्यास सदा सर्वदा सज्ज असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा