शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

शेर-ए-दख्खन शिवराय

http://www.islamdarshan.org/node/1188

शेर-ए-दख्खन शिवराय

- प्राचार्य व्ही. के. भदाणे 

शिवजयंती उत्सव - हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा उत्सव दरवर्षी आता १९ फेब्रुवारी रोजी रायगडावर भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. मोठ्या शहरात उत्साहाने हा उत्सव साजरा होत असतो पण ग्रामीण भागात तसा नाही.

शिवजयंतीची सुरुवात - केव्हांपासून आणि कोणी केली? हे अनेकांना माहीत नाही. काही म्हणतात, लो. टिळकांनी सुरू केली वगैरे परंतु टिळकांपूर्वी म. ज्योतिबा फुलेंनी शिवाजी राजेंची समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) त्यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच ’शिवजयंती उत्सव’ १८८६ साली सुरू केला.

इ. स. १६८० ते १८८६ याकाळात शिवजयंती उत्सव नव्हता. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर (१६८०) २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वतःचे राज्य उभे करणार्‍ायची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. आया-बहिणींच्या कपाळावर कुंकू गळ्यात मंगळसूत्र दिसले नसते, देवळांचे कळस, अंगणातली तुळसी हे सर्व लुप्त झाले असते. शिवजन्माचे वेळी अब्रुचा धिंगाणा, मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते. होणारा छळ असे भयानक चित्र होते. ते जाधवांच्या कन्या जिजाऊंनी पाहिले. शहाजी भोसल्यांनी अनुभवले आणि बालशिवाजीकडे पाहून स्वप्न रंगवले. स्वराज्याची उभारणी, रयतेचे, न्यायाचे, स्वातंत्र्याचे मराठी अस्मितेचे राज्य उभे करण्याची जिद्द ठेवून, अनंत यातना कष्ट सहन करून, मावळ्यांची फौज बांधून किल्ल्यामागे किल्ले घेत राज्य उभे केले. त्या राजाला पुर्वीचे लोक विसरले कसे?

जन्म देणाऱ्या इस्टेट सांभाळून ठेवणाऱ्या बापाला विसरावे, तसेच शिवशाहीनंतर झाले असे दिसते. कृतज्ञता का ठेवली गेली नाही कोण कसे आत्मभान आणि राजांबद्दलचा अभिमान विसले? लेखणीवाले, तलवारवाले विसरले कसे? आणि महाराष्ट्रीय जनता गप्प बसली कशी? यावरही संशोधन करून अनेकांनी प्रति इतिहास समोर आणला आहे. अजून संशोधनाची गरज आहे. खरा खोटा इतिहास समजून घेण्याची महाराष्ट्राला गरज आहे. जो समाज आपला इतिहास समजून घेऊन स्मरण ठेवतात तेच इतिहास घडवतात. आणि त्यांचाच विकास होतो, असं म्हणतात.

शिवाजी राजांची तुलना इतरांशी होऊ शकत नाही. अनेक राजे महाराजे झाले परंतु शिवरायांसारखा राजा होणे नाही असे इतिहासतज्ञ म्हणतात, ते खरं आहे. उदा. ज्युलियस सीझरचा वध केला तो ब्रुटसने. अतिशय जवळचा जीवस्य कंठस्य असा त्याचा मित्र होता. त्याने आपल्या मित्र राजाचा खून केला. असा मित्र कसा? शिवरायांचे मित्रांकडून कोणाकडूनही दगाफटका झाला नाही याउलट मावळ्यांनी राजासाठी प्राणाची पर्वा केली नाही. प्रसंगी बलिदान केले. हे स्वराज्य आपलं, राजा आपला समजत आणि शिवाजी राजेही सर्वांना आपलं मानीत. धारातिर्थी पडलेल्या, (स्वराज्याच्या कामी आलेल्या) मावळ्यांच्या विस्कळीत संसाराची घडी शिवरायांनी व्यवस्थित बसवयाचं महत्वपूर्ण काम केले तो आदर्श इतरांच्या समोर असे. आणि स्वतः राजे निर्व्यसनी, त्यांचं सैन्यही निर्व्यसनी असे अनेक आदर्श म्हणून सैन्य लढाई जिंकत असत. हा फरक शिवसैनिक व इतर सैनिकांच्या मध्ये आहे.

अलेक्झांडरचे उदा. भोलके आहे. त्याला ग-गविष्ठची बाधा होती. जिंकलेल्या राजांना तो रथ ओढायला लावी. त्या रथात स्वतः बसत असे. असलं वर्तन शिवाजी राजांचे नव्हते. शत्रू अफजल खानाच्या स्मृतीसाठी कबर बांधणारा, पराजित राजांचा मान ठेवणारा, मित्र राजांवर विश्वास ठेवणारा हा राजा त्यांची तुलना इतर मोठ्या३ समजणाऱ्या राजांशी होऊ शकत नाही. त्यांचेपेक्षा हा मराठा सम्राट उच्च स्थानावर आहे. नेपोलियन बोनापार्ट - दारू, दवा, नर्तकीच्या नादापायी संपला. राजा शिवाजीनी परस्त्रीस मातेसमान मानले, त्यांचा साडीचोळी देऊन मानसन्मान केला. मग ती सुभेदाराची सून असो की, गडाची मालकीन, बलात्कारीत सावित्री देसाई असो, हिंमत बहाद्दर हिरकणी असो त्यांचं नावही अजरामर केलं. आग्रा सुटका प्रकरणी फकिराच्या वेषात महाराष्ट्रात येत असतान एका म्हातारीच्या उपदेशाची अंमलबजावणी करून तिचाही सन्मान करणारे शिवराय! देश परदेशातील अनेक राजांना परंपरागत वडिलोपार्जित आपोआप राजगादी मिळत असे. त्यांनी सुख चैन विलासात आयुष्य घालविले. परंतु शिवाजी राजांच्या वाटेला अशी गादी वाट्याला आली नव्हती. अजिंक्य राजा शिवाजी - महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्याच्या डोंगरी किल्ल्यांचा मामुली छोट्या सैन्याचा अधिपती राजा शिवाजीने फक्त २७ वर्षाच्या काळात कितीकांना हैराण केले. त्यांची निंदणी, कापणी करून सपाटीकरण केले हे इतिहासाला ज्ञात आहे. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अतिदूरच्या साम्राज्यवाद्यांशी टक्कर देऊनत्यांना हुसकावून लावले. स्वजातीच्या जहागिरदार, नामदार, सरंजामदार देशमुख वतनदारांचा शिवरायांनी कचरा केला. त्यांचे समोर वाकायला भाग पाडले.

शिवाजी राजांचा रुपाब - दबदबा - रुबाबदार तेजस्वी चित्तवेधक असे शिवरायांचे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व होते. शरीर बलदंड नव्हते. पण होते ते कसलेले, चपळतेचे आणि लवचिक, प्रसंगी शक्तिशाली बनणारे होते. प्रतिभावान दूरदृष्टीचे होते. धाडसी होते. शिस्तप्रिय होते. सर्वदूर महाराजांचे नाव प्रसिद्ध होते. पराक्रमी दख्खनचा शेर म्हणून उत्तरेकडे राजाची ख्याती पसरली होती. आग्रा येथील लोक शिवाजी राजा येणार म्हणून वाट पहात. हमरस्त्यावर, झाडांवर, घराघरांच्या छतावर, उंच महालाच्या गच्चीवर गर्दी करीत उभे राहून प्रतिक्षा करीत होते.

’’वो देखो! वो देखो! दख्खनका शेर शिवाजी आ रहा है!’’

बायका पोरं तसेच वृद्ध सुद्धा उत्सुकतेने या अजिंक्य रुबाबदार आकर्षक व्यक्तिमत्वाच्या महाराष्ट्राच्या राजाला आग्राचे लोक पहात बोलत होते. तेही वाचायला मिळते. शत्रु / विरोधी राजांच्या वर बिनविरोध प्रेम कसे असते प्रजा किती खूष? तेही इतिहासात लिहिलेले आहे. शिवाजी, शंभूराजे म्हणजे चंद्र, सूर्य सैन्य, म्हणजे तारेसारखे शोभत असे इतिहासकार उपमा देतात.

शिवरायांबद्दल कोण काय म्हणाले? स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस, वीर भगतसिंग, उमाजी नाईक, क्रांतीसिंह नाना पाटील यांनी म्हटले होते. ’भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा शिवरायांकडून आम्हाला मिळाली.’ इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणाले - ’छत्रपति शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते.’ त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसवितांना अत्यानंद होत आहे. इतिहासकार ट्रायबन अॅनाल्ड - शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्याच्या स्मृतीचा ठेवा डोक्यावर ठेवून नाचलो असतो. खुद्द औरंगजेब बादशहाने महाराजांना पाठविलेल्या पत्रात म्हटलेले आहे, ’’मुसलमान धर्म रक्षक राजा शिवाजी.’’

ग्रँट उफ (इंग्लंड) चे उदगार आहेत ते लिहितात - ’’राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते.’’

महात्मा फुले म्हणतात - ’’क्षेत्री दुजाराजा नाही उपमेला!’’ - (’कुळवाडी भूषण’ - महाराजांवर रचलेला पोवाड्यात).

प्रबोधनकार ठाकरे म्हणाले - ’शिवाजी राजे इतके महान, इतके महान आहेत की त्यांच्यापुढे ३३ कोटी देवांची पलटन बाद होते.’ कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण महर्षी यांना एका देणगीदाराने देणगी देताना सांगितले की, काँलेजचे शिराजी नाव बदलून माझ्या बापाचे नाव द्या. त्यावर भाऊराव पाटील सडेतोडपणे म्हटले - ’’प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेल पण कॉलेजला दिलेले शिवरायांचे नाव मी कधीही बदलणार नाही.’’ लंडन गॅझेट (१६७२) यात लिहिले आहे (मराठी अनुवाद) ’’शिवाजीने मुघल साम्राज्याला सळो की पळो करून सोडले असून त्यांच्याकडून संपूर्ण ब्रिटीश साम्राज्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.... तो तर प्रत्यक्षात हिंदुस्थानचा राजाच आहे.’’ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नोंद केलेली आहे, ’’हिंदुस्थानच्या इतिहासातील फक्त शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्रच माझ्या अंतःकरणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होऊन राहिलाय. शिवाजी महाराजांइतकेच उज्वल चर्तर दुसऱ्या कुणाचे मला दिसले नाही. सद्यस्थितीत या महापुरुषाच्या वीर चरित्राचा आदर्श आम्हाला मार्गदर्शक आहे. शिवाजी महाराजांचा हा आदर्श सगळ्या हिदुस्थानासमोर ठेवला पाहिजे.’’

शिवाजी राजे कोणाचे? - शिवाजी राजे निर्धन लंगोटी मावळ्यांचे होते. बाराबलुतेदारांचे विविध जाती जमातीचे होते. शिवाजी राजे फक्त मराठ्यांचे अथवा हिंदु- ब्राम्हणांचे नव्हते ते कष्टकरी जनतेचे. रक्त ओतून शेती पिकविणाऱ्या शेतकर्यांचे होते. रयतेचे ते राजे होते. राजांजवळ मराठा मुसलमान धर्मभेद नव्हता. कोणत्याही धर्म, जात, पात यात भेदाभेद नव्हता. म्हणजे ते सर्वांचे होते.

शिवाजी शब्दांचे सामर्थ्य - शिवाजी! शब्दउच्चार झाल्याबरोबर सर्वसामान्यांच्या अंगी हत्तीचे बळसंचारते. मान, मस्तक, मेंदू, मनगट, ताठ होतात. भुवया विस्तारतात. मुठा आवळल्या जातात. रक्त उसळी घेत असते, ही जादू आहे, हे सामर्थ्य आहे, ’शिवाजी’ या शब्दात. तो ताठ होत जीवाला जीव देतो, हे सामर्थ्य आहे शिवाजी शब्दात. शोषणविरोधी ्संघर्षाचा वीररस या शब्दात भरलेला आहे. बलात्कार, अत्याचार याविरूद्ध डोळे फोडण्याची, हातपाय तोडण्याची, देहाचे तुकडे करण्याची ताकद आहे. अन्ययाविरूद्ध वागणार्यांना जमिनीत गाडण्याची शक्ती आहे. एवढे सामर्थ्य ’शिवाजी’ या एका शब्दाचे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा