शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

ब्राम्हणी हिंदु राष्ट्राचे गौडबंगाल

http://www.islamdarshan.org/node/1161


ब्राम्हणी हिंदु राष्ट्राचे गौडबंगाल

- विनोद उलिपवार 

टिळकानंतर अब्राम्हण गांधीचा लोकप्रियत नेते म्हणून उंचावलेला आलेख, डॉ. केशव बळीराम हेडगेवार सारख्या चाणक्याच्या नजरेत खटकला नसता तरच नवल! काँग्रेसचे नेतृत्व अब्राम्हणी व्यक्तिच्या हातात जाणे, ते बहरणे व संपूर्ण देशभर मान्य होणे चाणक्यासह सर्वांना खटकणारे होते. कारण गांधींच्या नेतृत्वाने देशातील सामान्य जनांना राजकीय चेतना दिली. म. फुले व शाहु महाराज यांनी चेतविलेली सामाजिक चेतनेची धुरा ओढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लवकरच दाखल झाले. याची जाण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना ज्या दिवशी विदेशात शिक्षणासाठी पाठविले, त्याच वेळेस आली. कारण शाहू महाराजांनी आंबेडकरांना कानमंत्र दिला आहे, याची माहिती ब्राम्हणी वर्तुळात दाखल करून नोंदल्या गेली होती. ज्या प्रबंधामुळे आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली तो प्रबंध म्हणजे ’कास्ट इन इंडिया’ याची चर्चा भारतात सुरू झाली होती. गांधींची राजकीय चेतना व फुले, शाहू, आंबेडकरांची सामाजिक, सांस्कृतिक चेतना जर चेकाळल्या तर ब्राम्हणवादाचे व ब्राम्हणांचे काही खरे नाही, याचीजाणीव ब्राम्हणी आध्यात्मिक यांत्रिकवाद्यांना येणे स्वाभाविक होते. या देशातील ब्राह्मणांच्या धार्मिक, वर्णीय वर्चस्ववादी एकाधिकारशाहिला अबाधित राखणे. यास्तव डॉ. हेडगेवारांनी संघनटेच्या बांधणीचा निर्धार केला. आध्यात्मिक यांत्रिकवादाने युरोपातील ऑस्ट्रिया, जर्मन व तत्सम देशातील आयरिश् वंशाचे प्राबल्य वाढल्यानंतर फायरबाख, नित्से, मक्समुलर, बिस्मार्क इ. यांत्रिकवाद्यांनी आयरिश वादाचा टेंभा मिरविण्यासाठी जर्मनीत सैनिकी संघटन बांधले व कार्यान्वित केले. हेडगेवारांनी सुद्धा टिळकांच्या गीता रहस्यातील ’ब्राम्हण’ आर्य वंशीय असल्याचे रहस्य उचलून १९२५ च्या दसऱ्याच्या दिवसापासून आर. एस. एस. कार्यप्रवण केली.

हिंदुराष्ट्रवादाच्या आच्छादनाखाली ब्राम्हणवाद कवेत घेवून, सकाळ संध्याकाळ आरएसएसच्या शाखा नागपूरातील महाल परिसरातील मोहिते वाड्यापासून सुरू करून नंतर विदर्भातील सर्व जिल्हे आणि मध्यप्रांत असा विस्तारत संपूर्ण देशभर जाळे निर्माण केले. मनुस्मृतीप्रणित चातुर्वर्ण्यव्यवस्था विस्कळू नये म्हणून हेडगेवारांनी ब्राम्हण राष्ट्ररादाच्या गोळवलकरी मंत्राने भारावून पेशवाई गेल्यापासूनची मरगळ झाडून काढली. वर्णवर्चस्ववाद्यांना या देशातील इतर वर्णीय / जातीय जनतेचं काहीही झालं तरी चिंता नाही. या देशाची सत्तासूत्रे फक्त त्यांच्या हातात त्यांच्या आदेशाबरहुकूम चालली पाहिजे व ती सुद्धा वर्णव्यवस्थेनुसार! यासाठी शस्त्र दुसऱ्याच्या खांद्यावर किंवा हातात ठेवून अथवा देवून कार्यभाग साधावयाचा, ही त्यांची जुनीच रणनिती ते वारंवार वापरतात. तरी सुद्धा या गोष्टी इतर जातितील लोकांच्या कशा काय लक्षात येत नाही?

या बाबत परिक्षण केले असता, असे दिसून आले की इतर जातीय लोकांमधील लालची अल्पसंतुष्ट व अल्प प्रयत्नात खूप काही प्राप्त करवून घेण्याची मनिषा बाळगणारे, अपरिपक्व व हवा भरल्यानंतर तठ्ठ होणारे व सामाजिक भान नसणारे अल्पशिक्षित व ’स्व’च्या पलिकडे विचार न करणारे तसेच प्रसिद्धी, प्रतिष्ठा यासाठी ’याची देही याची डोळा’ स्वप्न पाहणारे, अशा लोकांना लक्ष्य करून व हेरून व त्यांची एखादी कमजोरी उदा. बाई-बाटली-पैसा प्रकरणात अडकवून व त्यात ब्लॅकमेल व सौदेबाजी करून, त्याला मजबूर करून, सांग कामे करण्यास भाग पाडतात. समुहवादापासून बहुजनांनी दूर राहावे यास्तव धार्मिक कर्मकांड, पतवैकल्पे इ.त गुंतवून व मोक्ष प्राप्तीसाठी तसेच आध्यात्मिक शांतीच्या प्राप्तीसाठी भजन, किर्तन व प्रवचने यांचे स्तोम माजवून, भविष्यातील काल्पनिक संकटापासून मुक्तीची अभिलाषा दाखवून, विनाश्रम संकट निवारण होवू शकते अशी थाप ठोकून खर्चिक अभिषेक व वास्तुशांतीच्या पूजा बांधण्यास सांगतात व त्यातून प्रचंड लूट करतात आणि या सर्व गोष्टी लक्षात येवून सुद्धा बहुजन लोक संमोहित झाल्यासारखे गुंतून पडतात. ईश्वरावर विश्वास ठेवून ब्राम्हणाच्या म्हणण्यानुसार पूजा, अर्चा, आराधना व उपास, तापास केल्यास देव प्रसन्न होवून फलप्रप्ती होवू शकते अशी बतावणीने सतत गुंगीत ठेवतात. ’डिव्हाइड अँड रुल’ या मंत्राची प्रचिती अनुभवास येवून सुद्धा ब्राम्हणी श्रेष्ठत्व मानून, कनिष्ठत्व स्वीकारून आम लोक स्वतःवर गुलामी लादून घेतात. या परिस्थितीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचाराने विवेकी झालेले सत्यशोधकी कार्यकर्ते सातत्याने निरपेक्ष भावनेने कार्य करून जागृती करीत असून सुद्धा पळसाला पाने तीन सारखी या लोकांची गती आहे.

म. फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर व पेरियार इ.नी एवढी जागृती करून सुद्धा व संविधानाने दिलेल्या अधिकाराने लाभ व विकास करून घेण्याची अभिलाषा शूद्रादिशूद्र लोकांत का आकार घेत नाही. या कार्यासाठी ब्राम्हणी कमांड असलेल्या देशी व विदेशी कंपन्या अत्यंत महागड्या जाहिरातीच्या माध्यमातून पैशाचा ओघ या वाहिन्यांना सतत पुरवत असतात व उलटा प्रचार लोकांपर्यंत पोहचवित असतात. यामुळे आम लोक अभ्यास वाचन, चिंतन व सामाजिक बांधिलकीच्या जागृतीच्या कार्यक्रमापासून दूर राहात असून घरघुसे झाले आहेत व चेतनेच्या अभावाने न्यूनगंडात स्वत्वभान व स्वविश्वास गमावून दांदरलेल्या अवस्थेत दारिद्र्यात जीवन कंठत आहेत.

सर्व बहुजन दहशतीखाली जीवन जगतात. ही पेशवाईतील सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती आजच्या घडीला स्पष्ट रूपात प्रकट होताना दिसत आहे. डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापन करण्यापूर्वी वि. दा. सावरकर प्रणित ’हिंदु महासभा’ मुस्लिम लिगला पर्याय म्हणून समोर आली होती. परंतु ती संघासारखी हिंदू जनांना कव्यात घेवू शकली नाही. कारण संघाने हिंदु महासभेसारखे हिंदुत्वाच्या नावाखाली प्रखर मुस्लिम द्वेष व ब्राम्हणवाद समोर केला नाही किंबहुना संघाने हिंदुत्वाच्या नावाखाली योजनाबद्ध सशक्त ब्राम्हणवाद फलनिष्पतीपर्यंत नेताना ’समस्त हिंदूची एकी’ असं बिरूद मिरवीत, म. गांधी यांच्या काग्रेसी नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष भूमिकेची, हळूवार फिरकी घेत घेत खिल्ली उडवत अस्वस्थ गैरब्राम्हणी हिंदू मने काबीज करणारी रणनीती स्वीकारली. त्याचबरोबर, अखंड भारत सशक्त देश म्हणून स्वप्न रंगविणाऱ्या बॅ. जिनांच्या मनात म. गांधीला तोड मुस्लिम नेता म्हणून महत्वाकांक्षी केले व अखंड भारताच्या विभाजनाच्या द्विराष्ट्र संकल्पनेने भारावून टाकले. परिणामी १८९२ साली टिळकप्रणित सार्वजनिक गणपती उत्सवाच्या निमित्ताने उसळलेली हिदू-मुस्लिम दंगीलीची साखळीबद्ध सैरबरसात विसाव्या शतकाच्या चवथ्या दशकात, विज चमकल्याच्या गडगडात सर्वत्र फैलली व संघाला पोषक पार्श्वभूमी आकार घेवू लागली.

अशा तर्हेने, सतीच्या चितेवरील चेकाळलेल्या जालेच्या रंगासम रंग असलेला किंवा गावाबाहेर वेशिच्या अगोदर मंदिरात ठाण मांडून बसलेल्या दक्षिणमुखी आजन्म ब्रह्मचारी (सन् ईटर्) मारोतीरायाला लावलेल्या शेन्दुराच्या रंगासम रंग फासलेला, भगवाध्वजी ब्राम्हणी नवयांत्रिकवाद, या देशाला तळहातावर, हनुमंताने पहाड उचलल्यासम, खालीवर करून हेलकावे देत गैरब्राम्हणी जनांना गोंधळवून सोडण्याच्या अहर्निश सुडी महत्वाकांक्षेने पिसाळल्यासारखा शस्त्र संचालन करीत आहे व भारत मातेचाच जयजयकार करीत तीचीच कुस कुजवित आहे?

( साभार - बहुजन संघर्ष )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा