शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी

http://divyamarathi.bhaskar.com/article/purushottam-khedekar-book-ban-demand-2133415.html


पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी

सुधीर सूर्यवंशी | May 25, 2011, 11:55AM IST

जेम्स लेन या अमेरिकी लेखकावर टीका करणा:या पुरुषोत्तम खेडेकर या मराठी लेखकाने शिवरायांची बदनामी करणारे आणि ब्राह्मणांवर आक्षेपार्ह असे लिखाण केले. त्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी मराठी लेखकांकडून होत आहे.


अमेरिकी लेखक जेम्स लेन यांनी शिवरायांवर लिहिलेल्या पुस्तकावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आक्षेप घेऊन त्या पुस्तकावर राज्य सरकारला बंदी घालावयास लावली होती. त्या पुस्तकात लेन यांनी शिवाजी महाराजांची मानहानी होईल, असे लिखाण केले होते. तसेच लेन यांनी ब्राह्मणांबद्दल आणि त्यांच्या बायकांबद्दल अपमानकारक गोष्टी या पुस्तकात लिहिल्या होत्या.


खेडेकर यांचे हे पुस्तक मागील महिन्यात प्रकाशित झाले. या  पुस्तकात खेडेकर यांनी, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात झालेल्या जातीय दंगलींना ब्राह्मणांनी हवा दिली. या अपमानाचा बदला ब्राह्मणेेतरांनी घ्यायला पाहिजे, असे म्हटले आहे. 


एम. डी. रामटेके, ए. एन आंबेडकर त्यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे की, आपण खेडेकर आणि त्यांच्या ब्राह्मणांच्या विरोधातील आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. त्यांनी अशाच प्रकारचे लिखाण  चालू ठेवले तर लेखकांची प्रतिमा  नक्कीच मलिन होईल. आंबेडकर यांनी राज्य सरकारला या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.


अशी अपमानकारक भाषा कोणत्याही बुद्धिमान लेखकाकडून वापरली जात नाही, अशी टीका फुले-आंबेडकर तत्त्ववादी लेखक डॉ. हरी नरके यांनी केली आहे.


पश्चात्ताप नाही

या प्रकारच्या लिखाणाबद्दल त्यांना अजिबात पश्चात्ताप नाही. 'मी जे काही लिहिले ते सत्यच आहे. यासाठी कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. या लिखाणावर शंका असणा:यांनी आधी रामायण आणि महाभारतातील चुकीच्या लिखाणावर आक्षेप घ्यावा त्यानंतर माझ्या लिखाणावर आक्षेप घ्यावाÓ, असे खेडेकर यांनी म्हटले आहे.

==============================


पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर कारवाई करा ! - रामदास कदम यांची मागणी

‘महाराज, माफ करा..!!’ पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्याचे प्रकरण 
    मुंबई, ४ एप्रिल (वार्ता.) - हिंदूद्वेष्टे पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘महाराज, माफ करा...!!’ या शीर्षकाखाली पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यावर अतिशय अश्लाघ्य लिखाण करून त्यांची विटंबना करण्यात आली आहे. असे पुस्तक लिहिल्याच्या प्रकरणी खेडेकर यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे सदस्य श्री. रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली.
     (राज्यशासनाकडे खेडेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, याविषयी अनेकदा मागणी करण्यात आली आहे; मात्र राज्यशासनाने अद्याप त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. याचा जनतेने अर्थ काय घ्यायचा ? - संपादक)
    श्री. कदम पुढे म्हणाले, ‘‘खेडेकर यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रात समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाय पकडत आहेत आणि महाराज त्यांना त्याच पायाने उडवत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. या पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांच्यावर अतिशय अश्लील आणि विकृत लिखाण करण्यात आले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांविषयीच या पुस्तकात घाणेरडे लिखाण करण्यात आले आहे. त्याविषयी पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर कारवाई करा.’’
खेडेकरांच्या हिंदूद्रोहाच्या विरोधात दुसर्‍यांदा कारवाईची मागणी 
    पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांच्या बदनामीचे केंद्र’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज
यांचा अवमान करणारे लिखाण आहे.  विधान परिषदेचे सभापती यांच्यासह संपूर्ण सभागृहाला आव्हान देणारे
लिखाण या पुस्तकात करण्यात आले आहे. मागील वर्षी पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे सदस्य श्री. दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत औचित्याचे सूत्र मांडून खेडेकर यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती.
‘महाराज, माफ करा..!!’ या पुस्तकातील समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयीचा काही आक्षेपार्ह मजकूर
१. आज रामदासाच्या मृत्यूनंतर ३२५ वर्षांनी रामदासाबद्दल बहुजन समाजात चीड निर्माण होते. ही रामदासीसाठी अभिमानाची बाब नाही. रामदास जो होता तो होता. त्याला शिवरायांचे गुरुपद चिटकावून ब्राह्मणांनी गाढवाचा िंसह करण्याचा घाणेरडा प्रकार केला आहे. बहुजन समाजाने ब्राह्मणी लिखाणावर विश्वास ठेवून अज्ञानातून रामदासाला शिवरायांचे गुरुपद दिले होते. ब्राह्मणांनी ही हरामखोरी एवढ्यावरच थांबवली असती, तर आज वाद उभा राहून रामदासाची सत्य प्रतिमा जनमाणसांसमोर आणण्याची आम्हालाही गरज भासली नसती. ज्या रामदासाच्या अंगावर टिचभर लंगोटीशिवाय अंगभर वस्त्र नाही, त्या माणसाबद्दल लोकांना वेगळे सांगायची आवश्यकता नाही.
२. आज महाराष्ट्रासह सगळीकडेच रामदासाची हरामखोरी उघड होत असल्यामुळे रामदास नरकातही व्यथित झाला असेल, नरकात तो यमराजाकडे लेखी माफीनामा सादर करून भारतातील यमराजाच्या वतीने रामदासाने स्वर्गात शिवरायांकडे माफीपत्र पाठवून ‘महाराज, माफ करा..!!, अशी विनंती केल्याची बातमी रामदासी आकाशवाणीने दिली आहे. 

=============================



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा