शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

मुस्लिम म्हणजे कोण?

http://www.islamdarshan.org/node/838


मुस्लिम म्हणजे कोण? -नौशाद उस्मान

मुस्लिम म्हणजे कोण? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला! मुस्लिम म्हणजे मुस्लिमाच्या पोटी जन्मलेले किंवा अरबी-उर्दु नाव असलेली व्यत्ती म्हणजे मुस्लिम, हा गैरसमज आहे. इतर अनेक धर्मांविषयी ही गोष्ट खरी असू शकते, परंतु इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे. ही भूमिका फत्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही. त्यामुळे काही तथाकथित मुस्लिमांच्या वाइट कृत्यांना संपूर्ण समजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावा वर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...! समाजात शांती हवी असेल तर आम्ही एकमेकांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी थोडा वेळ खर्च करणे अगत्याचे आहे. सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला आपण समजून घेऊ या. मुस्लिम या शब्दाचा शब्दशः अर्थ आज्ञाधारक, आपली मान तुकविणारा असा होतो. या शब्दाचा भार्वार्थ असा होतो की, ईश्वर व त्याने पाठविलेल्या प्रेषितांचा आज्ञाधारक. या आज्ञाधारकतेमध्ये आज्ञाधारकाला काही दुय्यम गोष्टींबाबत स्वातंत्र्य असले तरी ते स्वातंत्र्य ईश्वर किंवा प्रेषितांच्या आज्ञा दुसर्या शब्दात कुराण व हदिस यांच्या आड येणारे स्वातंत्र्य  इस्लामला मान्य नाही. उदाहर्णार्थ, समजा एखाद्या कंपनीच्या कर्मचार्यांना कोणताही पोषाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु तोकडे कपडे परिधान करून कंपनीच्या परिसरात प्रवेश करण्यास परवानगी नाही. या नियमाला न जुमानणार्या कर्मचार्यावर कारवाही होऊन जर समजा त्याला बडतर्फ करण्यात आले. तर त्यानंतर तो त्या कंपनीचा कर्मचारी समजला जाणार नाही मग तो कितीही ज्येष्ठ व श्रेष्ठ असला तरीही. कारण त्याने कंपनीच्या फत्त एका नियमाचे उल्लंघन केले होते. त्याचप्रकारे कुराण व हदिसच्या  एखाद्या नीयमावर कुणी जर त्यावर आचरण करत नसेल तर गुन्हा ठरतो, मात्र त्या नियमाविरूद्द द्रोह करत असेल तर तो ईशद्रोही ठरतो. असे ईशद्रोही ’डूप्लिकेट’ मुस्लिम असतात. प्रेषित मुहम्मद (स.) हे सर्व मानवांकरिता अंतिम प्रेषित आहेत. हा निसर्ग दत्त नियम आहे. आता  त्यांच्यानंतर इमाम (धर्मगुरू), संत, धर्मप्रसारक तर होऊ शकतात मात्र धर्मशास्त्रात बदल अथवा विस्तार करण्याचा त्यांना मुळीच अधिकार नसेल. कुराण व हदीस यांना विसंगत ठरणार्या गोष्टींचा जर ते उपदेश देत असतील तर ते धर्मबाह्य ठरतील.               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा