शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

- महात्मा ज्योतिबा फुले

http://www.islamdarshan.org/node/1137


प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अस्पृश्यता नष्ट केली

- महात्मा ज्योतिबा फुले 

‘‘मुहम्मद झाला जहार्मद खरा ।।

त्यागिले संसारा । सत्यासाठी ।। धृ ।।

खोटा धर्म सोडा । सांगे जगताला ।।

जन्म घालविला । ईशापायी ।। 1 ।।

कोणी नाही र्शेष्ठ । कोणी नाही दास ।।

जात-प्रमादास । खोडी बुडी ।। 10 ।।

मोडीला अधर्म आणि मतभेद ।

सर्वात अभेद्य । ठाम केला ।। 11 ।।

केल्या कमाईचा न धरी अभिलाष ।

खैरात दीनास । देई सर्व ।। 12 ।।

मानवी मनाच्या घेई अंती ठाव ।

कल्याणाची हाव । पोटी माया ।। 13 ।।

मूर्तीपुजकांच्या बंडाशी मोडीले ।

ढोंगी वळविले । ईशाकडे ।। 14 ।।

आर्य दस्यु इस्लामने मुक्त केले ।

ईशाकडे नेले ।। सर्व काळ ।। 22 ।।

आर्यधर्म-भंड इस्लामे फोडीले

ताटांत घेतले ।। भेद नाही ।। 23 ।।

मांगासह आर्या नेले मसीदींत ।

गणी बांधवांत आप्त सखे ।। 24 ।।

संदर्भ : ‘म. फुल्यांचे समग्र वाड्मय,

भाग तिसरा, मानव महंमद (स.), पान क्र. 572’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा