शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

इस्लाम आणि अज्ञान

http://www.islamdarshan.org/node/996


इस्लाम आणि अज्ञान


लेखक : मौ. सय्यद अबुल आला मौदूदी
भाषांतर : अब्दुल जब्बार कुरैशी 

‘‘अल्लाह, असीम दयावंत व कृपावंतच्या नावाने’’

(दि.२३ फेब्रुवारी इ. स. १९४१ ला मजलिसे इस्लामियात, इस्लामीया कॉलेज, पेशावरच्या आमंत्रणावरून सदरहू लेख वाचला गेला होता.)
जगात माणसाचा ज्या ज्या वस्तूंशी संबंध येतो त्यापैकी कोणत्याही वस्तूशी तो कोणत्याही प्रकारचा व्यवहार तोपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत तो त्या वस्तूच्या वास्तवते व तिच्या कैफियतसंबंधी तसेच तिच्या व आपल्यातील परस्पर संबंधाबाबतीत आपले मत निश्चित करीत नाही. आपल्या जागी ते मत अचूक आहे की, चुकीचे याच्याशी काहीच कर्तव्य नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत वर उल्लेखित गोष्टीसंबंधी माणसाला कोणते ना कोणते मत निश्चित करावे लागते हे मात्र खरे. जोपर्यंत तो आपले मत निश्चित करीत नाही तोपर्यंत त्या वस्तूशी कोणत्या पद्धतीचे वर्तन आणि व्यवहार ठेवला जावा याचा तो निर्णय घेऊ शकत नाही. रात्रंदिवस आपल्याला याचा अनुभव येत असतो की, जेव्हा एखाद्या व्यक्तीशी आपली भेट होते तेव्हा ही व्यक्ती कोण आहे, कोणत्या पातळी व कोणत्या योग्यतेची आहे, तिचे गुणदोष काय आहेत आणि माझ्याशी याचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे, अशा सर्व माहितीची आपल्याला आवश्यकता भासते. याशिवाय आपण हे ठरवूच शकत नाही की, या व्यक्तीशी आपल्याला कोणते वर्तन ठेवावयाचे आहे. प्रत्यक्षपणे ही माहिती मिळाली नाही तरी चिन्हे व लक्षणांच्या आधारावर या गोष्टीसंबंधी आपल्याला अंदाजे मत तरी निश्चित करावेच लागते. अशाप्रकारे त्या व्यक्तीशी जे कोणते वर्तन आपणास ठेवावयाचे असेल ते याच मताच्या आधारावर आपण ठरवीत असतो. जे पदार्थ आपण खातो त्यांच्याशी आपला खाण्याचा व्यवहार यामुळेच आहे की, आपल्या प्रत्यक्ष माहितीत अथवा अनुमानानुसार त्या पदार्थांमुळे आपली अन्नाची गरज भागते. ज्या वस्तू आपण टाकून देतो, ज्या आपण उपयोगात आणतो, ज्या वस्तू आपण जपून ठेवतो, ज्यांचा आपण आदर करतो किवा ज्यांना तुच्छ मानतो, ज्यांची आपणास भीती वाटते किवा ज्यांच्याशी आपण प्रेम करतो, अशा सर्वांच्या बाबतीत आपले असे विभिन्न वर्तनसुद्धा त्याच मतावर आधारित असते जे आपण या वस्तूंची वास्तवता व त्यांच्या गुणदोषासंबंधी आणि आपल्याशी त्यांच्या संबंधाबाबतीत आपण निश्चित केलेले असते.
मग जे मत आपण वस्तूसंबंधी निश्चित करीत असतो, ते मत योग्य व अचूक असण्यावर आपले वर्तन योग्य व अचूक असणे आणि चूक व अयोग्य असण्यावर आपले वर्तन चूक व अयोग्य असणे अवलंबून असते. खुद्द त्या मताचे चूक किवा बरोबर असणे हे या गोष्टीवर आधारित असते की, आपण ते मत प्रत्यक्ष माहितीद्वारे निश्चित केले आहे की, अंदाज व अनुमानाद्वारे अथवा निव्वळ इंद्रियविषयक निरीक्षणाद्वारे. उदा. एखादे मूल जेव्हा अग्नी पाहते तेव्हा केवळ इंद्रियविषयक निरीक्षणाच्या आधारावर ते एखादे सुंदर, चकाकणारे खेळणे आहे, असे त्याचे मत बनते. म्हणून त्या मताच्या परिणामस्वरूप त्याच्याकडून असे वर्तन प्रकट होते की, ते मूल त्या अग्नीला उचलण्यासाठी आपला हात पुढे करते. दुसरी एखादी व्यक्ती त्याच अग्नीला पाहून त्यात देवत्व आहे किवा देवाचे प्रकट स्वरूप आहे, भ्रम किवा अनुमानाद्वारे त्याचे असे मत बनते. म्हणून या मताच्या आधारावर ती व्यक्ती निर्णय घेते की, याच्या पुढे नतमस्तक व्हावे असे माझे वर्तन असले पाहिजे. तिसरी एखादी व्यक्ती त्याच अग्नीला पाहून त्याच्या वास्तवतेचे व त्याच्या गुणदोषांचे संशोधन करते. अशा प्रकारच्या ज्ञान व संशोधनाच्या आधारावर ती व्यक्ती आपले असे मत निश्चित करते की, ही शिजविणारी आणि तापविणारी एक वस्तू आहे, तसेच माझ्याशी या वस्तूचा संबंध तोच आहे जो एखाद्या सेवकाचा आपल्या मालकाशी असतो. म्हणून या मताच्या आधारावर ती व्यक्ती अग्नीला खेळणेही बनवीत नाही व उपास्यही बनवीत नाही, तर त्याकडून प्रसंगानुसार शिजविण्याची, जाळण्याची आणि तापविण्याची सेवा घेते.
अशा प्रकारच्या निरनिराळ्या वर्तनांपैकी मुलाचे व अग्नी उपासकाचे वर्तन अज्ञानाची वर्तने आहेत, कारण मुलाचे हे मत की अग्नी केवळ एक खेळणे आहे, अनुभवानंतर चूक सिद्ध होते. तसेच अग्नी उपासकाचे असे मत की, अग्नी स्वतःच देव आहे किवा देवाचे ते प्रकट रूप आहे हे कोणत्याही ज्ञानाधिष्ठित पुराव्यावर आधारित नाही, तर निव्वळ भ्रामक कल्पनेवर आधारित आहे. याउलट अग्नीकडून सेवा घेणार्याचे मत शास्त्रीय आहे, कारण अग्नीसंबंधी त्याचे मत ज्ञानावर आधारित आहे.

जीवनाचे मूळ प्रश्न


वरील प्रस्तावना चांगल्याप्रकारे लक्षात घेतल्यानंतर आता जरा अंशात्मक गोष्टीकडून व्यापक गोष्टीवर दृष्टिक्षेप टाका. मनुष्याला या जगात आपले अस्तित्व जाणवते. त्याचे एक शरीर आहे, त्यात बर्याचशा शक्ती भरलेल्या आहेत. मनुष्यासमोर पृथ्वी व आकाशाचे एक महाविशाल पट पसरलेले आहे. त्यात अमाप व अगणित वस्तू आहेत. त्या वस्तूंचा उपयोग घेण्याचे सामर्थ्य आपल्यात असल्याचे त्याला आढळते. त्यांच्या अवतीभोवती बरीचशी माणसे, पशूप्राणी, वनस्पती आणि जड पदार्थ इ. विखुरलेले आहेत. या सर्व वस्तू त्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. मग जोपर्यंत तो सर्वप्रथम आपल्या स्वतःसंबंधी, अस्तित्वात असलेल्या या सर्व वस्तूसंबंधी व त्याच्याशी स्वतःच्या संबंधाबाबत एखादे मत निश्चित करीत नाही, त्यापूर्वीच तो त्यांच्याशी एखादे वर्तन अंगिकारू शकतो अशी कल्पनाही आपण करू शकतो का? जोपर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, मी कोण आहे, कसा आहे, जबाबदार आहे की बेजबाबदार आहे, स्वतंत्र आहे की अधीन, अधीन आहे तर कुणाच्या आणि जबाबदार आहे तर कुणासमोर? माझ्या या ऐहिक जीवनाची काही निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती? त्याचप्रमाणे हे शरीर आणि शरीरातील कुवती त्याच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत की अन्य कुणाच्या देणग्या आहेत. त्या कुवतीचा कोणी हिशोब विचारणारा आहे किवा नाही? त्या कुवतींना उपयोगात आणण्याचा कायदा त्याला स्वतःला निश्चित करावयाचा आहे की इतर कोणाला? जोपर्यंत तो या प्रश्नांसंबंधी निर्णय घेत नाही तोपर्यंत तो आपल्यातील कुवतीच्या उपयोगासाठी एखादा मार्ग ठरवू शकतो का? त्याचप्रकारे तो आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंसंबंधी एखादे वर्तन अंगिकारू शकतो का? जोपर्यंत हे निश्चित करीत नाही की त्या वस्तूंचा मालक तो स्वतः आहे की इतर कोणी, त्या वस्तूंवर त्याचा अधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे की अमर्याद, मर्यादित आहे, तर मर्यादांच्या सीमा ठरविणारा कोण आहे? त्याचप्रमाणे तो परस्परांत आपल्या मानवजातीशी वर्तणुकीची एखादी पद्धत तोपर्यंत निश्चित करू शकतो का जोपर्यंत याबाबतीत एखादे मत निश्चित करीत नाही की माणुसकीचे स्वरूप काय आहे, माणसामाणसादरम्यान फरक व श्रेष्ठत्व ठरविण्याचा आधार कोणता, शत्रुत्व आणि मित्रत्व, एकमत आणि मतभेद, सहकार आणि असहकार यांच्या आधारभूत गोष्टी कोणत्या? त्याचप्रमाणे ही सृष्टीव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे व त्यात मला कोणत्या प्रकारचे स्थान प्राप्त आहे, यासंबंधी तो एखाद्या निर्णयाप्रत येत नाही तोपर्यंत तो एकूणपणे या जगाशी एखादे वर्तन अंगिकारू शकतो का?
जी प्रस्तावना मी अगोदर मांडली आहे, त्या आधारावर निःसंकोचपणे असे म्हटले जाऊ शकते की, या सर्व गोष्टीसंबंधी कोणते ना कोणते मत निश्चित केल्याशिवाय कोणतेही वर्तन अंगिकारणे अशक्य आहे. प्रत्यक्षातसुद्धा जगात जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य या प्रश्नासंबंधी कळत वा नकळत कोणते ना कोणते मत जरूर बाळगतो. तसे करणे त्याला भाग आहे, कारण त्या मताशिवाय तो कोणतेही पाऊल उचलू शकत नाही. प्रत्येक माणसाने हमखासपणे या प्रश्नावर तात्त्विक दृष्टीने विचारचितन केले असावे आणि स्पष्टपणे शंकानिरसन करून एकेका प्रश्नासंबंधी निर्णय घेतला असावा, असे असणे जरूरीचे नाही. वस्तुतः बर्याचशा माणसांच्या मनात हे प्रश्न एखाद्या निश्चित स्वरूपात असतच नाहीत. ते त्याच्यासंबंधी जाणीवपूर्वक विचारही करीत नाहीत. परंतु असे असतानासुद्धा प्रत्येक माणूस ढोबळ स्वरूपात या प्रश्नासंबंधी होकारात्मक किवा नकारात्मक स्वरूपात एखाद्या मतापर्यंत निश्चितपणे पोचलेला असतो. जीवनात त्याचे जे काही वर्तन असते ते निश्चितपणे त्याच्या त्याच मतानुसार असते.
व्यक्तीव्यक्तीसंबंधी ज्याप्रमाणे ही गोष्ट खरी ठरते, त्याचप्रमाणे जाती व जमातीसंबंधीसुद्धा ती खरीच आहे. हे प्रश्न मानवी जीवनाचे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणून कोणत्याही सांस्कृतिक व्यवस्थेसाठी व कोणत्याही प्रकारच्या सामूहिक स्वरूपासाठी कोणतेही कार्यक्रम तोपर्यंत ठरविले जाऊ शकत नाहीत जोपर्यंत या प्रश्नांची कोणत्या ना कोणत्या प्रकारची उत्तरे निश्चित केली जात नाहीत. त्याची जी कोणती उत्तरे निश्चित केली जातील त्यानुसार नीतिमत्तेसंबंधीचा एक दृष्टिकोन निश्चित होईल. त्यानुरुपच जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांना आकार प्राप्त होईल आणि एकूणपणे त्या उत्तराच्या आवश्यकतेनुसारच एकूण संस्कृतीला रंग प्राप्त होईल. याबाबतीत कोणताही विपर्यास घडण्याची शक्यताच नाही. मग हे एका व्यक्तीचे वर्तन असो की एका समाजाचे, कोणत्याही परिस्थितीत त्याला अगदी तेच रूप प्राप्त होईल जे या प्रश्नाच्या उत्तरांचे स्वरूप असेल. इथपावेतो की, वाटल्यास एका व्यक्तीच्या किवा एखाद्या जमातीच्या वर्तनाचे पृथःकरण करून त्या वर्तनाच्या मुळाशी जीवनाच्या सदरहू मूलभूत प्रश्नाची कोणती उत्तरे कार्यशील आहेत, हे सहजपणे आपणास माहीत होऊ शकते, कारण एखाद्या व्यक्तीच्या किवा जमातीच्या वर्तनाचे स्वरूप एका दुसर्या प्रकारचे असावे व त्या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप एका वेगळ्याच प्रकारचे असावे ही गोष्ट अगदी अशक्यप्राय आहे. विपर्यास तोंडाने केला जाणारा दावा आणि प्रत्यक्ष वर्तनादरम्यान तर असू शकतो, परंतु वास्तविकपणे या प्रश्नांची जी उत्तरे मनात ठाण मांडून बसली आहेत, त्यांचे स्वरूप आणि प्रत्यक्ष वर्तनाच्या स्वरूपात कदापि भिन्नता असू शकत नाही.
आम्हाला आणखीन एक पाऊल पुढे गेले पाहिजे. जीवनाचे हे मूलभूत प्रश्न ज्यांच्यासंबंधी आपण आत्ताच ऐकले की त्यांच्या उलगड्यासंबंधीचे एखादे उत्तर आपल्या मनात निश्चित केल्याशिवाय मनुष्य जगात एक पाऊलसुद्धा पुढे जाऊ शकत नाही. आपल्या मूळ स्वरूपात ते सर्व परोक्ष बाबींशी संबंधित आहेत. त्याचे कोणतेही उत्तर क्षितिजावर लिहिलेले नाही की, प्रत्येक माणसाने जगात येताक्षणी ते वाचावे, तसेच त्याचे उत्तर इतके सामान्यही नाही की प्रत्येकास आपोआपच ते माहीत व्हावे. म्हणूनच सर्वच माणसांचे ज्याच्यावर एकमत होईल असे त्याचे कोणतेही एक उत्तर नाही, तर त्याच्यासंबंधी नेहमी मानवजातीत मतभेद राहिले आहेत. नेहमी निरनिराळी माणसे निरनिराळ्या पद्धतींनी त्याची उत्तरे प्रस्तुत करीत राहिली आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, प्रश्नांच्या निराकरणांचे कोणकोणते मार्ग संभवतात, कोणकोणत्या पद्धतीचा जगात अवलंब केला गेला आहे व त्या निरनिराळ्या मार्गानी जी उत्तरे समोर येतात ती कोणत्या प्रकारची आहेत?
या प्रश्नांच्या सोडवणुकीचा एक मार्ग असा की, माणसाने आपल्या ज्ञानेंद्रियांवर विश्वास ठेवणे व त्यांच्याद्वारे जे काही वाटते त्या आधारावर त्या प्रश्नासंबंधी एखादे मत निश्चित करावे.
दुसरा मार्ग असा की, ज्ञानेंद्रियाविषयक निरीक्षणाबरोबरच कल्पना अनुमानाला जोडून एक निष्कर्ष काढला जावा.
तिसरा मार्ग असा की, प्रेषितांनी सत्याचे प्रत्यक्षपणे ज्ञान मिळविण्याचा दावा करताना सदरहू प्रश्नांची जी उत्तरे सांगितली आहेत ती मान्य केली जावी.
जगात या प्रश्नांच्या सोडवणुकीचे हेच तीन मार्ग अवलंबिले गेले आहेत व बहुतेक करून हे तीनच मार्ग त्याबाबतीत संभवनीयही आहेत. यापैकी प्रत्येक मार्गाने एका वेगळ्या पद्धतीने या प्रश्नांचे निराकरण होते. प्रत्येक प्रकारच्या निराकरणानंतर एका विशिष्ट प्रकारचे वर्तन जन्म घेते व एका विशिष्ट प्रकारची सांस्कृतिक व्यवस्था उदयास येते. ही सांस्कृतिक व्यवस्था आपल्या मूलभूत गुणवैशिष्ट्यांत इतर सर्व निराकरणांद्वारे जन्मास आलेल्या वर्तनापेक्षा वेगळी असते. अशा विभिन्न मार्गांनी प्रश्नाचे कोणकोणते निराकरण समोर येते व प्रत्येक निराकरणामुळे कोणत्या प्रकारचे वर्तन जन्म घेते हेच आता मी दाखवू इच्छितो.

निखालस अज्ञान


ज्ञानेंद्रियांवर विश्वास करून मनुष्य जेव्हा या प्रश्नासंबंधी एखादे मत निश्चित करतो तेव्हा अशा विचारसरणीच्या अगदी स्वाभाविक तगाद्यामुळे तो या निष्कर्षापर्यंत येतो की सृष्टीची ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे अचानकपणे या प्रकटित उत्पत्तीची धामधूम होय. तिच्या उत्पत्तीमागे कोणतेही उद्दिष्ट किवा हेतू दडलेला नाही, उगीचच या सृष्टीव्यवस्थेने आकार घेतला आहे, उगीचच तिची वाटचाल होत आहे आणि उगीचच फलनिष्पत्तीविना ती अंत पावणार आहे. या सृष्टीव्यवस्थेचा कोणी स्वामी दिसत नाही, म्हणून एक तर त्याचे अस्तित्व असू नये व असले तरी मानवी जीवनाशी त्याचा कोणताही संबंध नाही. मानव एक प्रकारचा प्राणी आहे. कदाचित योगायोगानेच तो येथे उत्पन्न झाला आहे. त्याला कोणी निर्माण केले आहे की तो स्वतःच निर्माण झाला आहे, काही कळत नाही. असो, या प्रश्नांशी काही एक कर्तव्य नाही. आम्ही केवळ हेच जाणतो की, मानव पृथ्वीवर आढळतो, तो काही इच्छा व वासना बाळगतो, त्यांच्या पूर्ततेसाठी त्याची प्रकृती आतून जोर लावित असते, मानव काही सामर्थ्य आणि इंद्रिये व अवयव बाळगतो. ती इच्छा व वासनापूर्ततेची साधने बनू शकतात, त्याच्या सभोवती भूतलावर अमाप व अगणित सामग्री पसरलेली आहे, तिच्यावर मानव आपल्या अवयवांचा व कुवतींचा उपयोग करून आपल्या इच्छेची पूर्तता करू शकतो, म्हणून मानवाच्या कुवतींचा याशिवाय अन्य कोणताही उपयोग नाही की, त्याने आपल्या इच्छा व गरजांना कमाल पातळीने पूर्ण करावे. या जगाची योग्यता याशिवाय अन्य काहीच नाही की, ते लुटालुटीचे एक ताट आहे व ते यासाठी पसरले आहे की, मानवाने त्यावर ताव मारावे. वरती कोणीही शासक नाही, ज्यासमोर मानवाला जाब द्यावयाचे असावे. कोठे ज्ञानाचे उगमस्थान आणि मार्गदर्शनाचे मूलस्त्रोतही नाही की, जेथून मनुष्याला आपल्या जीवनासाठी नियम मिळू शकावेत, म्हणून मानव एक स्वतंत्र आणि बेजबाबदार प्राणी आहे. स्वतःसाठी कायदे बनविणे आणि आपल्या कुवतींचा उपयोग ठरविणे, तसेच अस्तित्वात असलेल्या इतर सृष्टीशी आपले वर्तन ठरविणे हे त्याचे स्वतःचे काम आहे. त्याच्यासाठी एखादे मार्गदर्शन आहे तर ते पशूप्र्राण्याच्या जीवनात, दगडांच्या आत्मवर्जनात किवा स्वतःच्या ऐतिहासिक अनुभवात आहे. त्याला एखाद्यासमोर जाब द्यावयाचा असेल तर त्याच्या स्वतः समोर किवा त्या सत्तेसमोर जी स्वतः मानवामधूनच उत्पन्न होऊन लोकांवर आरूढ झाली असेल. जीवन जे काही आहे ते केवळ ऐहिक जीवन आहे. कर्माची जी काही फळे आहेत ती याच जीवनाच्या मर्यादेत आहेत, म्हणून योग्य अयोग्य, उपयुक्त आणि हानीकारक, घेण्याचा व त्याज्य करण्याचा निर्णय केवळ त्याच फळांना विचारात घेऊन घेतला जाईल जे या जगात प्रकट होणार आहेत.
असा हा संपूर्ण जीवनासंबंधी एक दृष्टिकोन आहे. यात जीवनाच्या सर्व मूलभूत प्रश्नांचे उत्तर केवळ ज्ञानेंद्रियविषयक निरीक्षणाने दिले गेले आहे. या उत्तरांचा प्रत्येक भाग दुसर्या भागाशी कमीतकमी तार्किक संबंध आणि स्वाभाविक अनुकूलता जरूर राखतो. त्यामुळे मनुष्य जगात एक समतल व एकरूप वर्तन अंगिकारू शकतो, याचा विचार न करता की हे उत्तर व त्यामुळे निर्माण होणारे वर्तन आपल्या जागी चूक आहे की बरोबर. आता या उत्तराच्या आधारावर मनुष्य जगात जे वर्तन अंगिकारतो त्या वर्तनावर एक दृष्टिक्षेप टाकू या.
वैयक्तिक जीवनात या दृष्टिकोनाचा अपरिहार्य परिणाम असा आहे की, मनुष्याने प्रथमपासून ते शेवटपर्यंत मुक्त आणि बेजबाबदार वर्तन अंगिकारावे. त्याने स्वतःला आपल्या शरीराचा व आपल्या शारीरिक कुवतींना मालक समजावे म्हणून आपल्या इच्छेनुसार तो हवे त्याप्रमाणे त्यांचा उपयोग करील. जगाच्या ज्या वस्तू त्याच्या अधिकाराखाली येतील व ज्या माणसांवर त्याला सत्ता प्राप्त होईल, त्या सर्वांशी तो अशा प्रकारे वागेल जणू तो त्यांचा स्वामी आहे. त्याच्या अधिकारांना मर्यादित करणारी गोष्ट म्हणजे केवळ नैसर्गिक नियमांच्या मर्यादा आणि सामूहिक जीवनाची अनिवार्य बंधने असतील. त्याच्या स्वतःच्या मनात अशी कोणतीही नैतिक संवेदना, जबाबदारीची जाणीव आणि कोणाला जाब देण्याची भीती असणार नाही, जेणेकरून तो मोकाट होण्यापासून रोखला जात असावा. जेथे बाह्यस्वरूपाची बंधने नसतील किवा जेथे ती बंधने असतानादेखील आपले काम करण्याचे त्याला सामर्थ्य प्राप्त असेल, अशा ठिकाणी तर त्याच्या या धारणेचा स्वाभाविक तगादा असाच आहे की, ती अत्याचारी, बेइमान आणि अपहारकर्ता, दुष्ट आणि उपद्रवकारी असावा. स्वभावतः तो स्वार्थी, भौतिकवादी आणि संधिसाधू असेल. आपल्या मनोकामना आणि पाशवी गरजांची सेवा करण्याशिवाय त्याच्या जीवनाचा अन्य कोणताही हेतू असणार नाही. त्याच्या या जीवनध्येयाच्या दृष्टीने ज्या गोष्टींची किमत असेल अशाच गोष्टींना त्याच्या दृष्टीत महत्त्व प्राप्त असेल. लोकात अशा प्रकारची नीती व चारित्र्य निर्माण होणे सदरहू धारणेचा स्वाभाविक आणि तर्कशुद्ध परिणाम आहे. आपले हित आणि दूरदृष्टीमुळे अशा माणसाकडून दयाळूपणा, त्याग, आपल्या लोकसमूहाच्या कल्याण व प्रगतीसाठी जिवापाड परिश्रम आणि एकंदरीत त्याच्या जीवनात एक प्रकारची जबाबदारीपूर्ण नैतिकता प्रकट होणे शक्य आहे, यात शंका नाही. परंतु जेव्हा आपण त्याच्या वर्तनाचे पृथक्करण करू तेव्हा कळेल की, वास्तविकपणे त्याच्या स्वार्थीपणा व वासनेचेच हे व्यापक रूप आहे. तो आपल्या देशाच्या व राष्ट्राच्या कल्याणात आपले कल्याण पाहतो, म्हणून तो त्यांचे कल्याण इच्छितो. हेच कारण आहे की, असा मनुष्य जास्तीतजास्त केवळ एक राष्ट्रवादीच होऊ शकतो.
मग जो समाज अशा नीतिमत्ता बाळगणार्या माणसांनी बनेल त्या समाजाची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतील -
१) राजकारणाचा पाया मानवी सत्तेवर आधारित असेल, मग ती सत्ता एकाधिकारशाही असो, घराणेशाही असो, एखाद्या वर्गाची सत्ता असो की लोकशाही. सामूहिकतेची जास्तीतजास्त उच्च जी कल्पना केली जाऊ शकेल ती केवळ राष्ट्रकुल कल्पना असेल. अशा प्रकारच्या राज्यसत्तेत मानवच कायदे रचणारे असतील, सर्व कायदे इच्छा आणि अनुभवात्मक हिताच्या आधारे बनविले जातील, तसेच हित आणि लाभवाद दृष्टीसमोर ठेवूनच धोरणेही ठरविली जातील व बदलली जातील. अशा प्रकारच्या राज्यात जे लोक सर्वांत जास्त शक्तिशाली आणि सर्वांत जास्त चलाख, धूर्त, लबाड, दगलबाज, कठोर आणि दुष्ट वृत्तीचे असतील, तेच जोर करून पुढे येतील. समाजाचे मार्गदर्शन आणि राज्याची धुरा त्यांच्याच हातात असेल. त्यांच्या कायदेग्रंथात बळाचे नाव ‘सत्य’ आणि दुर्बलतेचे नाव ‘असत्य’ असेल.
२) कुटुंब आणि संस्कृतीची सर्व व्यवस्था भोगवादावर आधारलेली असेल. सुखोपभोगाची उत्कट इच्छा सर्व प्रकारच्या नैतिक बंधनांपासून मुक्त होत जाईल. नैतिक आचरणाचे सर्व प्रमाण अशा प्रकारे ठरविले जातील की, जेणेकरून सुखोपभोगाच्या मार्गात अडथळे कमीतकमी राहावेत.
३) अशाच विचारसरणीच्या कला व वाङमयावरसुद्धा पडसाद उमटतील. त्याच्यात नग्नता व विषयवासनांचे घटक वाढत जातील.
४) आर्थिक जीवनात काही जागिरदारी व्यवस्थांचे वर्चस्व राहील, तर कधी भांडवलशाही व्यवस्था तिची जागा घेईल, तर कधी कामगार गोंधळ माजवून आपली हुकूमशाही प्रस्थापित करतील. कोणत्याही परिस्थितीत अर्थकारणाचे नाते न्यायाशी जुळू शकणार नाही. कारण जग व संपत्तीसंबंधी या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत वर्तन अशा कल्पनेवर आधारित असेल की, ते लुटालूट करण्यासाठी पसरलेले एक ताट आहे. त्यावर आपल्या इच्छेनुसार व संधीनुसार ताव मारण्यासाठी ती मुक्त आहे.
मग अशा समाजात माणसांना तयार करण्यासाठी संस्कार व शिक्षणाची जी व्यवस्था असेल ती व्यवस्थासुद्धा जीवनाच्या त्याच कल्पनेशी व त्याच वर्तनाशी सुसंगती राखणार्या स्वभावाची असेल. त्या समाजात येणार्या प्रत्येक नवीन पिढीच्या मनात जग मानव आणि जगात माणूस म्हणून तीच कल्पना बसविली जाईल ज्या कल्पनेचे मी वर स्पष्टीकरण केले आहे. सर्व माहिती मग तिचा ज्ञानाच्या कोणत्याही शाखेशी संबंध का असू नये. येणार्या नवीन पिढीला अशी मांडणी करून ती माहिती दिली जाईल की, आपोआपच त्यांच्या मनात ती कल्पना रुजेल. मग सर्व संस्कार अशा पद्धतीने घडविले जातील की, त्या पिढीने जीवनात समाजात विलीन होण्यासाठी तयार व्हावे. अशा पद्धतीच्या संस्कार व शिक्षणव्यवस्थेसंबंधी आपणास काही सांगण्याची गरज नाही, कारण आपणा सर्वांनाच याची प्रचिती आली आहे. ज्या विद्यालयांत आपण शिक्षण घेत आहात त्यांची नावे जरी इस्लामिया कॉलेज आणि मुस्लिम युनिव्हर्सिटी असली तरी याच विचारसरणीच्या आधारावर ती चालत आहेत.
हे वर्तन ज्याचे आताच मी आपल्यासमोर स्पष्टीकरण केले आहे, ते निव्वळ अज्ञानाचे वर्तन आहे. सदरहू वर्तन अगदी त्या लहान मुलाच्या वर्तनाच्या स्वरूपाचे आहे जो केवळ आपल्या ज्ञानेंद्रियांच्या निरीक्षणावर विश्वास ठेऊन अग्नीला एक सुंदर खेळणे समजतो. फरक केवळ इतकाच आहे की, तेथे निरीक्षणाची चूक अनुभव घेतल्यानंतर लगेच त्याला जाणवते. कारण ज्या अग्नीला खेळणे समजून तो हात टाकण्याचे वर्तन अंगिकारतो तो उष्ण अग्नी असतो. हात लावताक्षणीच त्याला दाखवितो की मी खेळणे नाही. याउलट येथे निरीक्षणातील चूक दीर्घ काळानंतर उघड होते, किबहुना बहुतेकांवर तर उघडच होत नाही, कारण ज्या अग्नीवर हे हात टाकतात त्याची ज्वाला सौम्य आहे, परंतु चटका देत नाही तर शतकानुशतके तापवित राहते. तरीपण अनुभवापासून बोध घेण्यास एखादा तत्पर असेल तर जीवनाच्या सदरहू दृष्टिकोनामुळे लोकांच्या बेइमानी, पदाधिकार्यांचे अत्याचार, न्यायमूर्तींचे अन्याय, श्रीमंताचे स्वार्थ आणि जनसामान्यांच्या दुराचारांचा रात्रंदिवस कटू अनुभव त्याला येत असतो. तसेच याच दृष्टिकोनामुळे व्यापक प्रमाणात जातीयवाद, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, युद्ध, दंगे व उपद्रव, विस्तारवाद आणि वंश व जातीसंहाराच्या ज्या ठिणग्या पडत असतात, त्यांच्या घावापासून तो या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की, सदरहू वर्तन शास्त्रोक्त वर्तन नाही तर अज्ञानाचे वर्तन आहे, कारण मानवाने स्वतःसंबंधी व सृष्टीसंबंधी जे मत निश्चित करून सदरहू वर्तन अंगिकारले आहे ते वास्तविकतेला धरून नाही. एरव्ही त्याचे वाईट पडसाद उमटले नसते.
आता दुसरी पद्धत पडताळून पाहिली पाहिजे. जीवनाच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणाची दुसरी पद्धत अशी की, प्रत्यक्ष निरीक्षणासह कल्पना व अनुमानाचा उपयोग करून सदरहू प्रश्नांसंबंधी एखादे मत निश्चित केले जावे. या पद्धतीद्वारे तीन प्रकारची मते निश्चित केली गेली आहेत. त्या प्रत्येक मतापासून एका विशिष्ट प्रकारचे वर्तन निर्माण झाले आहे.

अनेकेश्वरवाद


त्या मतांपैकी एक मत असे आहे की, सृष्टीची ही व्यवस्था विनास्वामी तर नाही, परंतु तिचा केवळ एकच स्वामी (अधिपती व पालनकर्ता) आहे असे नाही, तर तिचे अनेक स्वामी (अधिपती व पालनकर्ते) आहेत. सृष्टीच्या निरनिराळ्या शक्तींचे निरनिराळे सूत्रधार आहेत, तसेच माणसाचे सुदैव व दुर्दैव, त्याचे यशापयश आणि त्याची हानी व लाभ अनेक शक्तींच्या कृपा व अवकृपेवर अवलंबून आहे. सदरहू मत ज्या लोकांनी स्वीकारले आहे, ज्यांनी मग तर्क लढवून हे निश्चित करण्याचा प्रयत्न केला की, दैवी शक्ती कोठे कोठे आणि कोणाकोणाच्या हातात आहे. असे करताना ज्या ज्या वस्तूंवर त्यांची दृष्टी जाऊन खिळली त्यांना त्यांनी देव मानले आहे.
या मताच्या आधारे मनुष्य जे वर्तन अंगिकारतो त्याची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत -
पहिले असे की, त्यामुळे माणसाचे उभे जीवन भ्रामक कल्पनेचे माहेरघर बनते. माणूस कोणत्याही शास्त्रोक्त पुराव्याविना केवळ आपल्या भ्रामक कल्पनेने बर्याचशा वस्तूंसंबंधी असे मत निश्चित करतो की, त्या चमत्कारिकरीत्या त्याच्या भाग्यावर इष्ट वा अनिष्ट प्रभाव टाकीत असतात. त्यामुळे तो इष्ट प्रभावाच्या भ्रामक आशेत आणि दुष्ट प्रभावाच्या काल्पनिक भीतीत गुरफटला जाऊन आपल्या बर्याचशा शक्तींना व्यर्थरीतीने वाया घालवून बसतो, कोठे एखाद्या कबरी व समाधीशी अपेक्षा करतो की, त्या त्याचे कार्य सिद्ध करतील, तर कोठे एखाद्या मूर्तीवर भिस्त ठेवतो की, ती त्याचे भाग्य उजळेल, कोठे एखाद्या काल्पनिक विघ्नहर्त्याला खूश करण्यासाठी धावपळ करतो, तर कोठे अशुभ शकुनामुळे वैफल्यग्रस्त होतो व शुभ शकुनाच्या आधारे कपोलकल्पित किल्ले उभारतो. अशा सर्व गोष्टी त्याचे विचार व प्रयत्नांना स्वाभाविक कृतीच्या मार्गापासून दूर करून एका अगदी अनैसर्गिक मार्गावर टाकतात.
दुसरे असे की, या मतामुळे पूजाअर्चा, नवस व नैवेद्य आणि इतर विधी व रूढींची एक लांबलचक नियमावली तयार होते. त्यात गुरफटून माणसाच्या शक्ती व प्रयत्नांचा मोठा भाग निरर्थक उद्योगांत खर्च होतो.
तिसरे असे की, जे लोक अनेकेश्वरवादी भ्रामक कल्पनेत गुरफटलेले असतात त्यांना मूर्ख बनवून आपल्या जाळ्यात अडकविण्याची चलाख व्यक्तींना चांगलीच संधी मिळते. एखादा राजा होऊन बसतो आणि सूर्य, चंद्र व इतर देवांशी आपला वंशसंबंध जोडून लोकाची अशी खात्री पटवितो की, ‘‘आम्हीसुद्धा देवापैकी आहोत, तुम्ही आमचे दास आहात.’’ एखादा पुरोहित अथवा मुजावर होऊन विराजमान होतो आणि म्हणतो की, ‘‘तुमचा लाभ व तुमची हानी ज्यांच्याशी निगडीत आहे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. तुम्ही आम्हाला माध्यम बनविल्याशिवाय त्यांच्याप्रत पोचू शकत नाही.’’ कोणी ताईत, गंडे आणि मंत्र व तंत्र चे सोंग करून लोकांची अशी खात्री पटवितो की, आमच्या या गोष्टी चमत्कारिकरीत्या तुमच्या गरजा भागवतील, मग अशा चाणाक्ष लोकांच्या वंशजांना कायमस्वरूपी घराण्याचे व वर्गाचे रूप येते, मग कालांतराबरोबर त्यांचे हक्क व अधिकार आणि प्रभाव व प्रतिष्ठेत वाढ होत जाऊन त्यांची पाळेमुळे खोलवर रूतली जात असतात. अशा प्रकारे या धारणेद्वारे शाही घराणे, धार्मिक व आध्यात्मिक नेते व पदाधिकार्यांच्या ईशत्वाचे जू सर्व माणसांच्या मानगुटीवर बसते. हे ढोंगी देव त्यांना अशा प्रकारे आपले सेवक बनवितात की, जणू ते त्यांच्यासाठी दूध देणारे व स्वारी आणि ओझे वाहणारी जनावरे आहेत.
चौथे असे की, हा दृष्टिकोन ज्ञानविज्ञान आणि कला व तंत्राज्ञानासाठी, साहित्य व तत्त्वज्ञानासाठी आणि संस्कृती व राजकारणासाठी कोणताही कायमस्वरूपी पाया उपलब्ध करीत नाही, तसेच या कपोलकल्पित देवांपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही की, ज्याचे नियमितपणे पालन व्हावे. या ढोंगी देवांशी माणसाचा संबंध केवळ या हद्दीत मर्यादित असतो की, माणसाने त्यांची कृपा व सहाय्य प्राप्त करण्यासाठी केवळ पूजेच्या काही विधी पूर्ण कराव्यात, उरले जीवनाचे इतर व्यवहार तर त्यांच्यासंबंधी नियम व कायदे करणे, अंमलबजावणीच्या पद्धती ठरविणे माणसाचे स्वतःचे काम आहे.
अशा प्रकारे अनेकेश्वरवादी समाज प्रत्यक्षात त्याच सर्व मार्गांवर चालतो ज्या मार्गांचा उल्लेख निव्वळ अज्ञानासंबंधी आताच मी केला आहे. तीच नीतिमत्ता, तेच आचरण, तीच सांस्कृतिक पद्धत, तीच आर्थिकव्यवस्था आणि तेच शिक्षण व साहित्य, या सर्व दृष्टींनी अनेकेश्वरवादाच्या वर्तनात आणि निव्वळ अज्ञानाच्या वर्तनात कोणताही मौलिक स्वरूपाचा फरक नसतो.

विरक्ती


निरीक्षणाबरोबर अनुमान व भ्रामक कल्पनेच्या सहाय्याने निश्चित केले जाणारे दुसरे मत असे की, हे जग आणि ते शरीर मानवासाठी एक यातनागृह आहे. मानवाचा आत्मा एक शिक्षा भोगणारा कैदी म्हणून या बंदीगृहात कैद केला गेला आहे. सुखोपभोग, इच्छा व वासना आणि त्यासंबंधीने मानवाला भासणार्या सर्व गरजा वास्तविकता या बंदीगृहाची साखळदंड आहेत. मनुष्य जितका या जगाशी व या जगातील वस्तूंशी संबंध ठेवील तितका जास्त तो या साखळदंडात अडकत जाणार आणि अधिक प्रकोपास पात्र ठरणार. मुक्तीचा मार्ग याशिवाय अन्य कोणताच नाही की, जीवनाच्या सर्व भानगडींपासून संबंध तोडले जावेत, इच्छा व वासना नष्ट केल्या जाव्यात, सुखोपभोगाशी काडीमोड घेतली जावी, शारीरिक गरजा आणि वासनापूर्तीला नकार दिला जावा, रक्त व मांसाच्या संबंधामुळे निर्माण झालेले सर्व प्रेम मनातून बाहेर घालविले जावेत आणि आपला शत्रू म्हणजे मन व शरीराला इंद्रियदमन आणि घोर तपश्चयेंद्वारे इतक्या यातना दिल्या जाव्यात की आत्म्यावर त्यांचे नियंत्रण राहू नये. अशाप्रकारे आत्मा हलका आणि स्वच्छ व निर्मळ होईल. त्यामुळे त्याला मुक्तीच्या उच्च स्थानाप्रत उड्डाण घेण्याची शक्ती प्राप्त होईल.
या मतानुसार जे वर्तन निर्माण होते त्याची गुणवैशिष्ट्ये अशी-
पहिले असे की, त्यामुळे माणसाची एकूण प्रवृत्ती व त्याचा कल सामूहिकतेकडून वैयक्तिकतेकडे आणि संस्कृतीकडून रानटी अवस्थेकडे वळतो. तो जग आणि जागतिक जीवनापासून तोंड फिरवून उभा राहतो. जबाबदार्यांपासून पळ काढतो. त्याचे संपूर्ण जीवन असहकार आणि असहयोगाचे जीवन बनते. त्याचे आचरण जास्त करून नकारात्मक स्वरूपाचे होते. दुसरे असे की, या मतामुळे सदाचारी लोक जगाच्या व्यवहारापासून दूर होऊन आपल्या मुक्तीच्या काळजीत एकांतवासाकडे धाव घेतात आणि जगाचे सर्व व्यवहार दुष्ट लोकांच्या हातात येतात.
तिसरे असे की, या मताच्या संस्कृतीवर जितक्या प्रमाणात प्रभाव होतो तितक्याच प्रमाणात लोकांत नकारात्मक नीतिमत्ता, असंस्कृतपणा आणि व्यक्तिगत स्वरुपाच्या प्रवृत्ती आणि निराशात्मक विचार निर्माण होतात, म्हणून प्रत्येक अत्याचारी सत्ता त्यांना सहजपणे नियंत्रणात आणू शकते. खरे म्हणजे हा दृष्टिकोन सामान्यजणांना अत्याचारापुढे लोटांगण घालणारे बनविण्यात जादूसमान प्रभाव राखतो.
चौथे असे की, मानवी स्वभावाशी या विरक्तिवादी दृष्टिकोनाचा सतत संघर्ष होत राहतो, त्यात बव्हंशी या दृष्टिकोनाचा पराभवच होत असतो. मग जेव्हा याचा पराभव होतो तेव्हा आपली दुर्बलता लपविण्यासाठी त्याला निमित्तांच्या छत्राखाली आश्रय घ्यावा लागतो. म्हणून कोठे प्रायश्चित्ताचे तत्त्व निर्माण होते, कोठे भौतिक प्रेमाचे सोंग भरले जाते तर कोठे संन्यासाच्या पडद्याआड असा भोगवाद अवलंबिला जातो की, ज्याची भौतिकवादींनासुद्धा लाज वाटावी.

अद्वैतवाद


निरीक्षण आणि अनुमानाच्या मिश्रणाने निर्माण होणारे तिसरे मत म्हणजे, मानव आणि सृष्टीच्या सर्व वस्तू आपल्या जागी स्वतः अवास्तविक आहेत. त्यांचे कायमस्वरूपी असे कोणतेही अस्तित्व नाही. वास्तविकपणे एका अस्तित्वाने या सर्व वस्तूंना आपल्या स्वतःच्या प्रकटीकरणाचे माध्यम बनविले आहे व तेच अस्तित्व या सर्व वस्तूंमध्ये कार्यरत आहे. विवरणांत या दृष्टिकोनाची असंख्य रूपे आहेत. परंतु त्या सर्व विवरणांत हाच एक समान विचार आहे की, सृष्टीच्या सर्व वस्तू म्हणजे त्याच एका अस्तित्वाचे बाह्य प्रकटरूप आहे. वास्तविकपणे अस्तित्वात तोच एकटा आहे त्याशिवाय काहीच नाही.

इस्लाम


आता आपण तिसर्या मार्गाकडे वळू या. जीवनाचे वर उल्लेखित मूळ प्रश्नासंबंधी पत निश्चित करण्याचा हा शेवटचा मार्ग आहे, तो असा की, प्रेषितांनी सदरहू प्रश्नांचे जे उत्तर सांगितले आहे ते स्वीकारले जावे.
या पद्धतीचे उदाहरण अगदी असे आहे की, जणू एखाद्या अपरिचित ठिकाणी आपण असू. आपल्याला त्या ठिकाणासंबंधी काहीच माहिती नसावी म्हणून दुसर्या एखाद्याकडे आपण विचारपूस करावी व त्याच्या मार्गदर्शनात तेथे फेरफटका मारावा, अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा, आपण प्रथम त्या परिसाराशी परिचित असण्याचा दावा करणार्या एखाद्या व्यक्तीचा शोध घेतो. मग खाणाखुणा व लक्षणांच्या आधारावर ती व्यक्ती विश्वासपात्र आहे किवा नाही याची आपण खात्री करून घेण्याचा प्रयत्न करतो. मग आपण त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात वाटचाल करून पाहतो. मग तेव्हा अनुभवाने असे सिद्ध होते की, त्या व्यक्तीने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार जी कृती आपण केली आहे त्याचा कोणताही वाईट परिणाम निघाला नाही. तेव्हा खरेखरच आपली खात्री पटते की, ती व्यक्ती या परिसराशी परिचित होती व त्या परिसरासंबंधी जी माहिती तिच्याकडून मिळाली ती अगदी खरी होती. ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे. दुसरी एखादी शास्त्रीय पद्धत जर उपलब्ध नसेल तर मत निश्चित करण्यासाठी हीच यथायोग्य पद्धत असू शकते.
आता पाहा, हे जग आपल्यासाठी एक अपरिचित स्थळ आहे. आपणास माहिती नाही की, याची वास्तवता काय आहे, याची व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या तत्त्वांवर हे कारखाने चालत आहेत, या जगात आपले स्थान काय आहे व या ठिकाणी आपल्यासाठी कोणते वर्तन योग्य आहे? आपण अगोदर असे मत निश्चित केले की, सकृद्दर्शनी जसे हे दिसत आहे खरी वास्तवताही अगदी तीच आहे. आपण या मतानुसार कृती केली, परंतु परिणाम चुकीचा निघाला, मग आपण कल्पना व अनुमानाच्या आधारे निरनिराळी मते निश्चित केली व त्या प्रत्येकानुसार कृती करून पाहिली. परंतु प्रत्येक वेळी परिणाम चुकीचाच निघाला. यानंतर शेवटचा मार्ग हाच आहे की, आपण प्रेषितांकडे वळावे. हे लोक माहिती असण्याचा दावा करतात, त्यांच्या स्थितीचा जितका शोध आणि तपासणी केली जाते त्यामुळे कळते की, ते अत्यंत खरे, अत्यंत विश्वस्त, अत्यंत सदाचारी, अत्यंत निःस्वार्थी आणि अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे लोक आहेत. म्हणून सकृद्दर्शनी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसे आधार उपलब्ध आहेत. आता केवळ इतकेच पाहणे उरते की, जगासंबंधी व जगात आपल्या स्थानासंबंधी जी माहिती ते देतात ती कुठपर्यंत पटणारी आहे, त्या माहितीविरुद्ध एखादा शास्त्रीय पुरावा तर नाही ना? त्या माहितीनुसार जे वर्तन अंगिकारले गेले, अनुभवाअंती ते कसे सिद्ध झाले? संशोधनपर रितीने जर या तिन्ही गोष्टींची उत्तरे समाधानकारक मिळाली, तर त्यांच्या मार्गदर्शनावर श्रद्धा व विश्वास ठेवला पाहिजे. जीवनात तेच वर्तन अंगिकारले पाहिजे, जे त्या दृष्टिकोनानुसार असेल.
मी वर सांगितल्याप्रमाणे मागे सांगितलेल्या अज्ञानांच्या पद्धतीच्या विरुद्ध ही पद्धत शास्त्रीय पद्धत आहे. या ज्ञानासमोर जर माणसाने मान तुकविली, अहंकार आणि स्वच्छंदीपणा सोडून या ‘ज्ञाना’चे पालन केले आणि आपले वर्तन त्याच मर्यादेत राहू दिले, ज्या मर्यादा या ज्ञानाने घातल्या आहेत तर याच पद्धतीचे नाव ‘‘इस्लामी पद्धत’’ असे आहे.

सृष्टी व मानवासंबंधी प्रेषितांचा दृष्टिकोन


प्रेषित म्हणतातः मानवाभोवती पसरलेले हे विद्यमान विश्व की मानव ज्याच्या एक अंश आहे, ते विश्व योगायोगे आकस्मिकपणे निर्माण झालेला एखादा हंगामा नाही, तर एक सुसूत्र, शिस्तबद्ध राज्य आहे. त्याला अल्लाहने रचले आहे. तोच त्याचा स्वामी आहे व तोच एकटा त्याचा शासक आहे. हे विश्व एक एकाधिकारशाही व्यवस्था आहे. त्यात सर्व अधिकार केंद्रिय सत्तेच्या हातात आहेत. त्या सर्वोच्च अधिकाराशिवाय येथे कोणाचाही हुकूम चालत नाही. या सृष्टीव्यवस्थेत ज्या ज्या शक्ती कार्यशील आहेत, त्याच्याच आज्ञेने कार्य करीत आहेत. कोणाची बिशात नाही की, त्याच्या आज्ञेपुढे शिरजोरी करावी किवा त्यांच्या आज्ञेविना स्वअधिकाराने हालचाल करावी. या सार्वभौम व्यवस्थेत कोणाच्या अधिकारस्वातंत्र्याला व बेजबाबदारपणासाठी कोणतेही स्थान नाही. प्राकृतिकरीत्या असे असूही शकत नाही. मानव या ठिकाणी जन्मजात रयत आहे. रयत असणे त्याच्या इच्छेवर अवलंबून नाही, तर हा रयत म्हणूनच जन्माला आला आहे व रयतेशिवाय काही अन्य बनणे त्याच्यासाठी शक्य नाही, म्हणून मानव स्वतः आपल्यासाठी जीवनपद्धती रचण्याचा व आपले कर्तव्य स्वतःच निश्चित करण्याचा अधिकार बाळगत नाही. हा कोणत्याही वस्तूचा मालक नाही की, आपल्या मालमत्तेत उलाढाल करण्याचा कायदा स्वतःच तयार करावा. मानावाचे पूर्ण शरीर व त्याच्या सर्व कुवती अल्लाहच्या मालकीच्या आहेत व त्याच्या देणग्या आहेत, म्हणून आपल्या इच्छेनुसार तो यांचा उपयोग करण्याचा अधिकार बाळगत नाही, तर ज्याने या वस्तू त्याला प्रदान केल्या आहेत त्याच्या इच्छेनुसार त्याने त्यांचा उपयोग केला पाहिजे.
त्याच प्रकारे ज्या वस्तू मानवाच्या सभोवती जगात आढळतात,जमीन, जनावरे, पाणी, वनस्पती, धातू इ. या सर्व अल्लाहच्या मालकीच्या आहेत, मानव त्यांचा मालक नाही, म्हणून त्यांचासुद्धा आपल्या इच्छेनुसार उपयोग करण्याचा मानवाला कोणताही अधिकार नाही, तर त्यांच्या मूळ मालकाने त्यांच्याशी व्यवहार करण्याचे जे नियम निश्चित केले आहेत त्यानुसार त्याने त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे.
त्याचप्रमाणे जमिनीवर वास्तव्य करणारी ती सर्व माणसेसुद्धा की, ज्यांचे जीवन एकमेकांशी निगडित आहे, अल्लाहची रयत आहेत, म्हणून त्यांना आपल्या परस्परांच्या संबंधाबाबतीत स्वतः नियम आणि कायदे निश्चित करण्याचा हक्क नाही. त्यांचे सर्व प्रकारचे संबंध ईश्वरनिर्मित कायद्यानुसार असले पाहिजेत.
उरली ही गोष्ट की, तो ईश्वरनिर्मित कायदा काय आहे? तर प्रेषित म्हणतात की, ज्या ज्ञानमाध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला जगाची आणि तूमच्या स्वतःची वास्तवता सांगत आहोत त्याच ज्ञानमाध्यमाद्वारे आम्हाला ईश्वरी कायदासुद्धा माहीत झाला आहे. ईश्वराने स्वतः आम्हाला हे ज्ञान दिले आहे आणि आम्हाला यासाठी नियुक्त केले आहे की, तुम्हाप्रत हे ज्ञान आम्ही पोचते करावे, म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्हाला आपल्या बादशाहाचा प्रतिनिधी मान्य करा आणि आम्हाकडून त्याचा सनदशीर कायदा घ्या.
मग प्रेषित आम्हाला सांगतात की, सकृद्दर्शनी तुम्ही जे पाहता की, विश्वसत्तेचा सर्व कारभार शिस्तबद्धरीतीने चालत आहे, परंतु त्याचा अधिपतीही दिसत नाही व त्याचे कार्यकर्तेसुद्धा काम करताना दिसत नाहीत. तसेच हे जे एक प्रकारचे अधिकारस्वातंत्र्य तुम्हाला आपल्यात जाणवत असते की, हवे त्या प्रकारे काम करावे, मालकाचे वर्तनही अंगिकारू शकता आणि हवे तर मूळ मालकाशिवाय इतरांसमोरसुद्धा बंदगी व आज्ञापालनार्थ मान तुकवू शकता. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला रोजी प्राप्त होते, कार्यसाधने होत असतात आणि विद्रोहाची शिक्षा लगेच दिली जात नाही, तर या सर्व गोष्टी तुमची परीक्षा घेण्यासाठी आहेत. ज्या अर्थी तुम्हाला बुद्धी, निष्कर्षशक्ती आणि निवडशक्ती दिली आहे म्हणून मालकाने स्वतःला आणि आपल्या शासन व्यवस्थेला तुमच्या दृष्टिआड ठेवले आहे. तो तुमची परीक्षा घेऊ इच्छितो की, तुम्ही आपल्या शक्तीचा कसा उपयोग करता. त्याने तुम्हाला समज व बोधशक्ती दिली आहे. आवडीनिवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच एक प्रकारचे अधिकारस्वातंत्र्य (Autonomy) देऊन सोडून दिले आहे. आता जर तुम्ही आपल्या रयत असण्याच्या स्थानाची जाण ठेवली आणि कोणत्याही प्रकारच्या शक्तीविना तुम्ही आपले ते स्थान मान्य केले, तर आपल्या स्वामीने घेतलेल्या परीक्षेत तुम्ही यशस्वी ठराल. परंतु जर रयत असण्याचे स्थान जाणून घेतले नाही किवा जाणून घेतल्यानंतरसुद्धा द्रोहात्मक वर्तन अंगिकारले, तर परीक्षेत अपयशी ठराल. याच परीक्षेच्या हेतूने तुम्हाला जगात काही अधिकार दिले गेले आहेत, जगात बर्याचशा वस्तू तुमच्या अधिकारात दिल्या गेल्या आहेत व तुम्हाला आयुष्यभराचा अवधी दिला गेला आहे. यानंतर प्रेषित आम्हाला सांगतात की, ऐहिक जीवनपरीक्षेचा अवधी असल्याकारणाने येथे हिशेबही नाही आणि मोबदला व शिक्षाही नाही. या ठिकाणी जे (यासंबंधी ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात घेतली पाहिजे की, हे जग ज्यात आम्ही सध्या आहोत वास्तविकपणे ते प्राकृतिक जग आहे, नैतिक जग नाही. ज्या नियमांवर सृष्टीची विद्यमान व्यवस्था चालत आहे, ते नैतिक नियम नाहीत तर नैसर्गिक नियम आहेत. म्हणून विद्यमान सृष्टीत कर्माने नैतिक परिणाम पूर्णपणे उमटू शकत नाहीत, ते परिणाम उमटूही शकत असले तरी केवळ तितक्याच प्रमाणात जितक्या प्रमाणात नैसर्गिक नियम त्यांना प्रकट होण्याची संधी देतील.)काही दिले जाते ते एकाद्या सत्कृत्याचे बक्षीसच असेल हे जरूरीचे नाही. ते या गोष्टीचे चिन्ह नाही की, अल्लाह तुमच्यावर प्रसन्न आहे अथवा जे काही तुम्ही करीत आहात ते योग्य आहे, तर केवळ परीक्षेचे साधन आहे. धनदौलत, संतती, संपत्ती, सत्ता, जीवनसामग्री या सर्व त्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला परीक्षेच्या हेतूने दिल्या जातात की जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर कार्य करून दाखवावे व आपल्या चांगल्या किवा वाईट गुण व लायकीचे प्रदर्शन करावे. त्याचप्रमाणे जे त्रास आणि ज्या हानी सोसाव्या लागतात जी संकटे इ. येत असतात तेसुद्धा एखाद्या वाईट कृत्याची शिक्षा असावी हे जरूरीचे नाही, तर त्यांच्यापैकी काही नैसर्गिक नियमाकाली आपोआप प्रकट परिणाम आहेत. (१) काही परीक्षेच्या सदराखाली येतात (उदा. व्यभिचार करणार्याचे रोगग्रस्त होणे ही त्याच्या गुन्ह्याची नैतिक शिक्षा नाही तर त्याचा नैसर्गिक परिणाम आहे. जर तो उपाय करण्यात यशस्वी ठरला तर आजारमुक्त होईल. परंतु नैतिक शिक्षेपासून वाचू शकणार नाही. त्याने जर पश्चात्ताप (तौबा) केली तर नैतिक शिक्षेपासून तर तो वाचणार परंतु रोगमुक्त होणार नाही.
एरव्ही जेथे नैसर्गिक नियम त्याचे प्रकट होण्यासअनुकूल नसावी तेथे त्यांचे प्रकट होणे कठीण आहे. उदा. जर एखाद्या व्यक्तीने दुसर्या एखाद्याला ठार केले तर त्या कृत्याचे नैतिक परिणाम प्रकट होणे अवलंबून आहे या गोष्टीवर की, त्या व्यक्तीचा शोध लावणे त्यावर गुन्हा साबीत होणे आणि त्यावर नैतिक दंड लागू होण्यासाठी नैसर्गिक नियम सहाय्यक असावेत. जर ते सहाय्यक नसतील तर कोणतेही नैतिक परिणाम मुळापासून प्रकटच होणार नाही. जर ते अनुकूल राहीले तरी त्या कृत्याचे नैतिक परिणाम पूर्णतः प्रकट होऊ शकणार नाहीत. कारण ठार झालेल्याऐवजी मारेकर्याला केवळ ठार करणे म्हणजे त्याने केलेल्या कृत्याचे पुरेपूर नैतिक परिणाम नाही, म्हणून हे जग बदल्याचे ठिकाण नाही व असूही शकत नाही. मोबदल्याच्या ठिकाणासाठी एक अशी विश्वव्यवस्था आवश्यक आहे, ज्यात विद्यमान विश्वव्यवस्थेविरुद्ध शासकीय नियम, नैतिक नियम असावेत, नैसर्गिक नियमांचा दर्जा त्यांचे सेवक म्हणून असावा. तथ्ये खंडित करू शकतात, दृष्टिकोन नव्हे. म्हणून जोपर्यंत असे दाखवून दिले जात नाही की, प्रेषितांनी, सृष्टी व मानवाविषयी प्रस्तुत केलेल्या कल्पनेला एखाद्या सिद्ध झालेल्या सत्याने चुकीने सिद्ध केले आहे, त्याची खंडित झालेल्या दृष्टिकोनात गणना करणे पूर्णतः एक अशास्त्रीय आणि पूर्वग्रह दोषयुक्त दावा आहे.)तर काही यामुळे दृग्गोचर होत असतात की, वास्तवतेविरुद्ध मत निश्चित करून जेव्हा तुम्ही एखादे वर्तन अंगिकारता जेव्हा अपरिहार्यपणे तुम्हाला आघात पोचतो. (२) तात्पर्य हे जग बदल्याचे ठिकाण नाही तर परीक्षेचे स्थान आहे. या ठिकाणी जे परिणाम प्रकट होते असतात ते एखाद्या पद्धतीच्या किवा एखाद्या कृत्याचे चूक किवा बरोबर, चांगले किवा वाईट, त्यात करण्यालायक किवा अंगिकार करण्यालायक असण्याचे प्रमाण ठरू शकत नाही. खरे प्रमाण परलोकातील परिणाम आहेत. जीवनकालावधी संपल्यावर एक दुसरे जीवन आहे, ज्यात तुमच्या संपूर्ण कामगिरीची तपासणी करून निर्णय दिला जाईल की, तुम्ही परीक्षेत यशस्वी ठरला आहात की अयशस्वी. तेथे ज्या गोष्टीवर यशापयश अवलंबून आहे ती ही की, प्रथमतः तुम्ही आपल्या दृष्टी आणि निष्कर्षशक्तीचा योग्य उपयोग करून सर्वश्रेष्ठ अल्लाहचे सत्ताधीश असणे व त्याच्याकडून आलेली शिकवण व मार्गदर्शन हे अल्लाहकरवीच असणे या गोष्टीला ओळखले किवा नाही. दुसरे म्हणजे त्या वस्तुस्थितीला ओळखल्यानंतर (निवडण्याचे स्वातंत्र्य असतानासुद्धा) तुम्ही स्वखुशीने व आवडीने सर्वश्रेष्ठ अल्लाहची सत्ता व त्याच्या कायद्यात्मक हुकूमापुढे मान तुकविली किवा नाही.

इस्लामी दृष्टिकोनाचे परीक्षण


जग आणि मानवासंबंधी प्रेषितांनी प्रस्तुत केलेला हा दृष्टिकोन एक परिपूर्ण दृष्टिकोन आहे. त्याच्या सर्व घटकांत एक तार्किक संबंध आहे. कोणताही घटक दुसर्या घटाकाशी विपरीत नाही. या दृष्टिकोनाद्वारे जगाच्या सर्व घटनांचा पूर्णपणे उलगडा होतो, तसेच सृष्टीच्या सर्व चिन्हांचे स्पष्टीकरण होते. कोणतीही एखादी वस्तूसुद्धा निरीक्षणात किवा अनुभवात अशी येत नाही की, या दृष्टिकोनाद्वारे त्याची कारणमीमांसा केली जाऊ शकत नसावी. म्हणून हा एक शास्त्रीय दृष्टिकोन (Scientific Theory) आहे.’ शास्त्रीय दृष्टीकोना’ ची जी कोणती व्याख्या केली जाईल ती यावर तंतोतंत लागू होते.
मग कोणतेही निरीक्षण अथवा अनुभव आजतागायत असे झाले नाही जेणेकरून या दृष्टिकोनाचे खंडन होत असावे, म्हणून हा आपल्या जागी दृढ आहे. खंडित झालेल्या दृष्टिकोनात याची गणना होऊ शकत नाही.
(एखाद्या व्यक्तीचे दरिद्री होणे त्याच्यासाठी या गोष्टीची परीक्षा आहे की, तो आपल्या गरजा भागविण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करतो की वैध साधनांचाच उपयोग करण्यावर दृढ राहतो. संकटांच्या वेढ्यात सत्यनिष्ठतेवर अटळ राहतो की अस्वस्थ होऊन असत्यासमोर मान तुकवितो.
अर्थात, जेव्हा मनुष्य या जगाला विनाईश्वर आणि स्वतःला निरंकुश समजून काम करतो, तेव्हा वास्तविकपणे हे जग विनाईश्वर नसल्याने आणि मानवसुद्धा निरंकुश नसल्याकारणाने वस्तुस्थितीच्या विरुद्ध कृती केल्यामुळे त्याला अपरिहार्य आघात सहन करावा लागतो. याचे उदाहरण असे आहे जसे अग्नीला खेळणे समजून आपण हातात धरले तर हात जळाल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण वस्तुस्थितीविरुद्ध वर्तन अंगिकारले आहे.
एखाद्या काळातील शास्त्रीय दृष्टिकोनाचे याच्याविरुद्ध असणे हे या गोष्टीचा पुरावा ठरू शकत नाही की हा दृष्टिकोन खंडित झाला आहे. एखाद्या शास्त्रीय दृष्टिकोनाला केवळ वास्तविक गोष्ट मानून सृष्टी व्यवस्थेचे जे निरीक्षण आम्ही करतो त्यानुसार हा दृष्टिकोन अत्यंत संभाव्य (चीीं झीलिरलश्रश) स्वरूपाचा वाटतो. सृष्टीत जी सुसूत्रता आढळते ती पाहून असे म्हणणे की तिचा कोणी सूत्रधार नाही, यापेक्षा असे म्हणणे की तिचा कोणी सूत्रधार आहे, हे अधिक बुद्धिप्रामाण्य आहे. त्याचप्रकारे त्या सूत्रतेपासून असा निष्कर्ष काढणे की, ही विकेंद्रीय व्यवस्था आहे व अनेक सूत्रधारांच्या अधिकाराखाली ती चालत आहे, यापेक्षा ती एक केंद्रीय व्यवस्था असून तिचा एकच सर्वाधिकारी सूत्रधार आहे हा निष्कर्ष अधिक योग्य आहे. त्याचप्रमाणे या सृष्टीव्यवस्थेचे जे वैभवशाली राज्य स्पष्टपणे जाणवते त्याला पाहून हे सर्वकाही निरुद्देश आणि एका मुलाचे खेळणे म्हणून आहे, असे मत निश्चित करण्यापेक्षा ती एक विवेकपूर्ण आणि ध्येयात्मक व्यवस्था आहे, हे मत अधिक बुद्धिप्रामाण्य आहे.)
मग जेव्हा आम्ही या दृष्टीने विचार करतो की, ज्या अर्थी खरोखरच ही सृष्टीव्यवस्था एक राज्य आहे. मानव त्या व्यवस्थेतील एक अंश आहे, त्या अर्थी ही गोष्ट आम्हाला यथायोग्य वाटते की, या व्यवस्थेत मानवाच्या अधिकारस्वातंत्र्याला व त्याच्या बेजबाबदारपणाला कोणतेही स्थान असू नये. त्याचे योग्य स्थान रयतेतच असले पाहिजे या दृष्टीने आम्हाला हा यथायोग्य (Most Reasonable) असा दृष्टिकोन वाटतो.
मग जेव्हा शास्त्रीय दृष्टिकोनाने आम्ही पाहतो तेव्हा हा अगदी अमलात येण्याजोगा दृष्टिकोन आहे. जीवनाची एक संपूर्ण योजना आपल्या तपशीलानिशी या दृष्टिकोनाच्या आधारे उभी राहते, तत्त्वज्ञान आणि नैतिकतेसाठी, ज्ञान व तंत्रज्ञानाबरोबरच साहित्य आणि कलेसाठी, राजनीती आणि राज्यव्यवस्थेसाठी, तह व युद्ध आणि आंतरराष्ट्रीय संबंधासाठी माणसाला या दृष्टिकोनाबाहेर जाण्याची गरज भासत नाही.
आता आपल्याला केवळ हेच पाहावयाचे उरले आहे की, सदरहू दृष्टिकोनाआधारे व्यावहारिक जीवनात कोणत्या प्रकारचे वर्तन आकार घेते व त्याचे परिणाम काय आहेत.
वैयक्तिक जीवनात या दृष्टिकोनामुळे इतर अज्ञानी दृष्टिकोनाच्या उलट एक अत्यंत जबाबदारीपूर्ण आणि अगदी शिस्तबद्ध वर्तन निर्माण होते. या दृष्टिकोनावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा की, माणसाने आपले शरीर, शक्ती आणि जग व त्याच्या कोणत्याही वस्तूला आपल्या मालकीची समजून मुक्तपणे उपयोगात आणू नये, तर ईश्वराच्या मालकीची समजून केवळ त्याच्या कायद्याच्या पालनार्थ उपयोग करावा. त्याला प्राप्त असलेल्या प्रत्येक वस्तूला ईश्वराची अनामत समजावी आणि असे समजून तिला उपयोगात आणावी की, मला या अनामतीचा पूर्णपणे हिशोब द्यावयाचा आहे. हिशोबही त्याला द्यावयाचा आहे ज्याच्या नजरेतून माझे कोणतेही कृत्य किबहुना मनात दडलेला कोणताही इरादासुद्धा लपलेला नाही, असा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत एका शिस्तीचे पालन करील हे उघड आहे. तो इच्छा व वासनांच्या पूर्ततेसाठी मोकाट जनावराप्रमाणे बनू शकत नाही, तो अत्याचारी व अपहारकर्ता असू शकत नाही, त्याच्या चारित्र्यावर पूर्णपणे भरवसा केला जाऊ शकतो, कायद्याचे पालन करण्यासाठी त्याला कोणत्याही बाहेरच्या दबावाची गरज भासत नाही, त्याच्या अंतःकरणात एक जबरदस्त नैतिक नियमन उत्पन्न होते, ते त्याला अशा प्रसंगीसुद्धा सत्य आणि सचोटीवर दृढ ठेवते, जेथे त्याला अन्य कोणत्याही भौतिक शक्तीकडून जाब विचारण्याचा धोका नसतो. हे ईशभय आणि अनामतीची जाणीव अशी गोष्ट आहे की, समाजाला विश्वासपात्र माणसे उपलब्ध करण्याची यापेक्षा अधिक मोठ्या उपायाची कल्पना केली जाऊ शकत नाही.
याच्याही पुढे जाऊन हा दृष्टिकोन माणसाला केवळ झटणारा व धडपड करणारा माणूस बनवितो, इतकेच नव्हे तर त्याच्या धावपळीत स्वार्थ, भोगवाद अथवा राष्ट्रवादाऐवजी सत्यवादीपणा आणि उच्चकोटीच्या नैतिक उद्दिष्टांच्या मार्गावर आणतो. जो इसम स्वतःसंबंधी असे मत बाळगतो की, ‘‘मी जगात निरर्थक आलेलो नाही तर ईश्वराने मला कार्य करण्यासाठी येथे पाठविले आहे, तसेच माझे जीवन स्वतःसाठी वा इतर संबंधित लोकांसाठी नव्हे तर ज्यात ईश्वराची प्रसन्नता आहे अशा कामासाठी आहे, त्याचप्रमाणे मी तसाच सोडला जाणार नाही तर माझ्याकडून पुरेपूर हिशेब घेतला जाईल की, मी आपल्या वेळेचा व आपल्या कुवतीचा किती व कसा उपयोग केला आहे, अशा माणसासारखा प्रयत्नशील, परिणामकारक व योग्य करणारा माणूस अन्य असू शकत नाही. म्हणून हा दृष्टिकोन अशी उत्तम माणसे निर्माण करतो की, त्यांच्यापेक्षा अधिक बेहतर वैयक्तिक वर्तनाची कल्पना करणे कठीण आहे.

आता सामूहिक पैलूने पाहा


सर्वप्रथम तर हा दृष्टिकोन मानवी सामूहिकतेचा पाया बदलून टाकतो. या दृष्टिकोनानुसार सर्व मानव ईश्वराची रयत आहेत. प्रजा असण्याच्या संबंधाने सर्वांचे हक्क समान, सर्वांचे स्थान समान आणि सर्वांसाठी संधी समान. कोणतीही व्यक्ती, कोणतेही घराणे, कोणतेही वर्ग, कोणतीही जात व लोकसमूह आणि कोणत्याही वंशासाठी इतर माणसांवर कोणत्याही प्रकारचे श्रेष्ठत्व आणि उच्चता नाही व विशिष्ट हक्कही नाहीत. त्याप्रकारे माणसावर माणसाच्या सत्तेचे व श्रेष्ठत्वाचे मूळ कापले जाते व बादशाही, जहागिरदारी व सरंजामशाही तसेच भटशाही आणि पोपशाहीपासून उत्पन्न होणार्या सर्वच दुष्टतेचा एकाच वेळी नायनाट होतो.
मग या गोष्टीमुळे अशा जमाती व जातीयवाद, वंशीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिकवादाचेही उच्चाटन होते, ज्यामुळे जगात सर्वांत जास्त रक्तपात घडला आहे. या दृष्टिकोनानुसार संपूर्ण भूतल, ईश्वराचा द्वेष आणि मानव ‘आदम’ची संतती व ईश्वराचे दास आहेत. श्रेष्ठत्वाचा आधार वंश व जात, धनदौलत अथवा वर्णाच्या सफेदी वा लालीवर नाही, तर आचारांची निर्मळता आणि ईशभयावर आधारित आहे. जो सर्वांत जास्त ईशभय बाळगणारा आणि सदाचार व पापभिरूतेचा अवलंब करणारा आहे, तोच सर्वाधिक श्रेष्ठ आहे.
त्याचप्रकारे माणसा माणसादरम्यान सामूहिक संफ व संबंध अथवा फरक आणि भेदभावाचा आधारसुद्धा या दृष्टिकोनात पूर्णपणे परिवर्तीत केला गेला आहे, माणसाने आपल्या आविष्करणाद्वारे ज्या गोष्टींना एकत्रीकरण आणि विभागीकरणाचे आधार ठरविले आहे, त्या गोष्टी मानवजातीला असंख्य भागात विभागतात व त्या विभागांदरम्यान अभेद्य अशा भिती उभ्या करतात. कारण वंश किवा देश अथवा राष्ट्र किवा वर्ण अशा गोष्टी नाहीत, ज्यांना मनुष्य बदलू शकत असावा व एका समूहामधून दुसर्या समूहात जाऊ शकत असावा. याउलट हा दृष्टिकोन माणसामाणसादरम्यान एकत्रीकरण व विभागकरणाचा आधार ईश्वराची बंदगी व त्याच्या कायद्याच्या पालनावर ठेवतो. जे लोक निर्मितीची बंदगी सोडून ईश्वराची बंदगी अंगिकारतील आणि ईश्वराच्या कायद्याला आपल्या जीवनाचा एकमेव कायदा मान्य करतील ते सर्व एक जमात आहेत. परंतु जे तसे करणार नाहीत ते दुसरी जमात. अशा प्रकारे विभिन्नता नष्ट होऊन केवळ एकच फरक शिल्लक राहतो व तोसुद्धा दूर होण्यासारखा आहे. कारण एखाद्या व्यक्तीसाठी हे कोणत्याही वेळी शक्य आहे की, तिने आपली श्रद्धा व जीवनप्रणाली बदलून घ्यावी व एका जमातीतून दुसर्या जमातीत सामील व्हावे.
अशा सर्व सुधारणांनंतर जो समाज या दृष्टिकोनाच्या आधारे रचला जातो त्याची विचारसरणी, प्रेरणा आणि सामूहिक रचना (Social Structure) पूर्णपणे परिवर्तीत झालेली असते. त्यात राज्य मानवी सत्तेवर नव्हे तर ईश्वरी सत्तेच्या आधारावर उभे राहते.१ सत्ता ईश्वराची असते, कायदा ईश्वराचा असतो, मानव केवळ ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. ही गोष्ट प्रथमतः तर या सर्व दुष्टतांना नष्ट करते ज्या माणसाची माणसावरील सत्तेमुळे आणि मानवाच्या कायदेरचनेमुळे उत्पन्न होत असतात. मग या दृष्टिकोनाच्या आधारे राज्य उभे राहण्यामुळे एक अत्यंत वैभवशाली फरक असा होतो की, संपूर्ण राज्यव्यवस्थेत ईश्वराची बंदगी आणि पापभिरूतेची प्रेरणा पसरते. अधिकारी व रयत दोन्ही असे समजतात की आम्ही ईश्वराच्या राज्यात आहोत. आमचा संबंध प्रत्यक्षपणे जो परोक्ष व अपरोक्षाचे ज्ञान बाळगणारा आहे, त्याच्याशी आहे. कर अदा करणारा असे समजून कर भरतो की, तो ईश्वराला कर अदा करीत आहे. तसेच कर वसूल करणारे व तो खर्च करणारे असे समजून काम करतात की, ही संपत्ती अल्लाहची संपत्ती आहे, आम्ही केवळ विश्वस्त म्हणून काम करीत आहोत. एका शिपायापासून ते न्यायाधीश आणि राज्यपालापर्यंत शासनाचा प्रत्येक कार्यकर्ता आपले कर्तव्य त्याच विचारसरणीने पार पाडीत असतो ज्या विचारसरणीने तो नमाज पढत असतो. दोन्ही कार्ये त्याच्यासाठी एकसमान उपासना आहे. दोन्ही तीच ईशभिरूता आणि पापभिरूता जरूरीची आहे. त्यातील निवासी आपल्यापैकी ज्या लोकांना ईश्वराच्या उत्तराधिकाराचे कर्तव्य पार पाडण्यासाठी निवडतात त्यांच्यात सर्वप्रथम ईशभय, सचोटी, दानत व प्रामाणिकपणा याच गुणांचा शोध घेतात. कशा प्रकारे असेच लोक वर येत असतात व अधिकार त्यांच्याच हातात दिले जातात, ते समाजात सर्वांत जास्त चारित्र्यसंपन्न असतात.
सांस्कृतिक आणि कौटुंबिक जीवनातसुद्धा हा दृष्टिकोन तीच ईशभिरूता आणि निर्मळ चारित्र्याची प्रेरणा पसरवितो. त्यात भोगवादाऐवजी ईशभक्ती असते. सर्व माणसामाणसाच्या दरम्यान ईश्वराचे माध्यम विद्यमान असते. ईश्वराचा कायदा दोन्हीच्या (सविस्तर ाहितीसाठी पहा ‘‘इस्लामचा राजकीय दृष्टीकोन’’) संबंधाचे नियमन करतो. हा कायदा सर्व मनेच्छा, वासना आणि स्वार्थापासून पवित्र असलेल्या सर्वज्ञ आणि बुद्धिमानही असलेल्याने बनविला आहे, म्हणून यात उपद्रवाची प्रत्येक वाट आणि अत्याचाराचे प्रत्येक दार बंद केलेले आहे. त्यात मानवी स्वभावाच्या प्रत्येक पैलूला व त्याच्या प्रत्येक गरजेला दृष्टीसमोर ठेवलेले आहे.
या ठिकाणी इतका वेळ नाही की, मी या दृष्टिकोनाच्या पायावर उभ्या राहणार्या त्या सामूहिक इमारतीचा संपूर्ण आराखडा प्रस्तुत करावा. परंतु जे काही मी सांगितले आहे त्यावरून आपण कल्पना करू शकता की, प्रेषितांनी सृष्टी व मानवासंबंधी जो दृष्टिकोन प्रस्तुत केला आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारचे वर्तन उत्पन्न होते व त्याचे परिणाम काय आहेत व काय असू शकतात. हा कागदावरील एखादा काल्पनिक आराखडा (Utopia) असावा अशातली गोष्ट नाही, तर इतिहासात या दृष्टिकोनाच्या आधारे एक सामुदायिक व्यवस्था आणि एक राज्य उभारून दाखविले गेले आहे, इतकेच नव्हे तर जे लोक या दृष्टिकोनाद्वारे तयार केले गेले होते, त्याच्यापेक्षा बेहतर लोक भूतलावर कधीच आढळले नाहीत व तसेच मानवासाठी त्या राज्यापेक्षा अधिक कृपावान दुसरे कोणतेही राज्य ठरले नाही याची इतिहास साक्ष देत आहे. त्या समाज व राज्य व्यवस्थेमधील लोकांत नैतिक जबाबदारीची संवेदना इतकी तीव्र झाली होती की, एका खेडूत स्त्रीला व्यभिचाराने गर्भधारणा होते. तिला माहीत आहे की, माझ्या या गुन्ह्याच्या दंड दगडांनी ठेचून ठार करण्याची भयंकर शिक्षा आहे, परंतु ती स्वतः होऊन येते आणि विनंती करते की, तिला शिक्षा केली जावी, तिला सांगितले जाते की, गर्भमुक्त झाल्यानंतर ये, कोणताही जातमुचलका आणि जमीन न घेता तिला सोडून दिले जाते. गर्भमुक्त झाल्यानंतर पुन्हा ती खेड्यातून येते व शिक्षा करण्याची विनंती करते, तिला सांगितले जाते की, बाळाला दूध पाज आणि जेव्हा दूध पाजण्याचा कालावधी संपेल तेव्हा ये. ती पुन्हा आपल्या खेड्याकडे रवाना होते. तिच्यावर कोणत्याही पोलीसाची देखरेख नसते. अंगावरचे पाजण्याची मुदत संपल्यानंतर ती पुन्हा येऊन विनंती करते की, आता तिला शिक्षा करून तिच्या हाताने जे पाप घडले आहे त्यापासून तिला मुक्त केले जावे. म्हणून तिला दगडांनी ठेचून ठार केले जाते. जेव्हा ती गतप्राण होते तेव्हा तिच्यासाठी कृपेची प्रार्थना केली जाते. तिच्यासंबंधीने एकाच्या तोंडातून नकळतच जेव्हा असे शब्द निघतात की, ‘‘किती निर्लज्ज स्त्री होती !’’ तेव्हा उत्तरात सांगितले जाते की,
‘‘ईश्वराची शपथ, तिने अशी क्षमायाचना (तौबा) केली होती की जर अवैधरीत्या कर वसूल करणार्याने जरी तशी क्षमायाचना केली असती तर त्यालाही क्षमा मिळाली असती.’’
ही स्थिती तर त्या समाजाच्या व्यक्तीची होती आणि त्या राज्याची स्थिती अशी होती की, त्याची शासकीय मिळकत कोट्यावधी रुपयांप्रत पोचलेली होती. त्या राज्याचे खजिने इराण, सीरिया आणि मिस्त्रच्या संपत्तीने ओतप्रोत भरत होते, परंतु त्या राज्याचा अध्यक्ष केवळ मासिक दिडशे रुपये वेतन घेत होता. त्या राज्याच्या शहरात दान घेण्यास पात्र उरावा, असा शोधूनसुद्धा कोणी आढळत नव्हता.
या अनुभवानंतरसुद्धा जर एखाद्याचे या गोष्टीवर समाधान होत नसेल की, प्रेषितांनी सृष्टीव्यवस्थेच्या वास्तवतेसंबंधी व त्यात मानवाच्या स्थानासंबंधी जो दृष्टिकोन प्रस्तुत केला आहे, तो सत्य केला आहे तर अशा व्यक्तीचे समाधान करण्यासाठी दुसरा एखादा मार्ग मिळणे केवळ अशक्यप्राय आहे. कारण ईश्वर, फरिश्ते आणि परलोकाच्या जीवनाचे प्रत्यक्ष निरीक्षण कोणत्याही परिस्थितीत तो करू शकत नाही. परंतु ज्या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण अशक्य असेल तेथे अनुभवापेक्षा अधिक अचूक प्रमाण दुसरे कोणतेही नाही. उदाहरणार्थ, एखादा वैद्य आजारी व्यक्तीच्या आत प्रत्यक्ष निरीक्षण करून जेव्हा हे पाहू शकत नाही की, त्याच्या प्रकृतीत नेमका कोणता बिघाड उत्पन्न झाला आहे, तेव्हा तो निरनिराळी औषधे त्याला देऊन पाहतो. मग जे औषध त्या अंधारकोठडीत अचूकपणे आपला वेध टिपते, तिच्यामुळे रोग दूर होणे हाच या गोष्टीचा भक्कम पुरावा असतो की, प्रकृतीत वास्तविकपणे जो बिघाड उत्पन्न झाला होता, हे औषध तंतोतंत त्यानुसार होते. त्याचप्रमाणे ज्याअर्थी मानवी जीवनाची घडी दुसर्या कोणत्याही दृष्टिकोनाने नीट होत नाही व केवळ प्रेषितांच्याच दृष्टिकोनाने ती नीट होते, त्याअर्थी हासुद्धा या गोष्टीचा पुरावा आहे की हा दृष्टिकोन सत्याधिष्ठित आहे. खरोखर ही सृष्टी अल्लाहचे राज्य आहे आणि खचितच या जीवनानंतर दुसरे एक जीवन आहे व त्यात मानवाला आपल्या ऐहिक जीवनाच्या कामगिरीचा हिशोब द्यावयाचा आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा