शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

- ब्रिगे. सुधीर सावंत

http://www.islamdarshan.org/node/1125


देशाला दिशा देणारे नेतृत्व हवे

- ब्रिगे. सुधीर सावंत 

अपघाताने असो वा कर्तृत्वाने असो १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासात पुन्हा एकदा भारतावर सूर्य तळपायला लागला असतानाच, दुसरीकडे हाच भारत अंधःकारामध्ये गटांगळ्या खात भरकटत चालला आहे. इतिहासाच्या निर्णायक टप्प्यावर या देशाला सावरून योग्य दिशेला नेण्याचे काम आजचे प्रस्थापित राजकीय नेतृत्व तर करूच शकत नाही. ’शीला की जवानी‘ नंतर ’चिकनी चमेली‘ आपल्याला पाहायला मिळत आहे. लावणी ही महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. लावणीतील शब्दरचना, काव्य, नृत्यातील मादकता, आपेश आणि रंग ग्रामीण महाराष्ट्रातील जीपनापर आधारित आहे. लावणीमध्ये शृंगार असतो, पण कती नसते. कतरिना कैफच्या ’चिकनी चमेली‘ या गाण्याने लावणीचे वेश्या व्यावसायिकरण करून टाकले आणि हिंदी सिनेमाने अश्लीलतेचे एक नवे टोक गाठले! महापुरुषांच्या जयंतीला वा कुणाच्या लग्नसमारंभाला, वाढदिवसाला तुम्ही गेलात तर दोन गाणी हमखास ऐकायला मिळतात ’मै झंडू बाम बनी‘ आणि ’शिला की जवानी!‘ खाजगिकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या जगात हॉलीवूड - बॉलीवूडप्रमाणेच आपल्या मुलींच्या अंगारचे कपडे झडायला लागले आहेत, अतितंगही व्हायला लागले आहेत. याची काळजी कुणालाच दिसत नाही. ही आजच्या भांडवलशाही व्यपस्थेची उपभोगवादी दशा आहे. भारतीय संस्कृती खड्ड्यात गेली व पाश्चात्य जीवन पद्धती आपण कधी अंगिकारली हे कळलेच नाही. हे सर्व आपोआप घडलेले नाही, तर नियोजनबद्ध पद्धतीने मानवाला आपल्या अंकीत करण्यासाठी रचण्यात आलेल्या अमेरिकन कारस्थानाचा तो भाग आहे.

अमेरिकन भांडवलशाहीने पूर्ण जगाला अंकित करण्यासाठी एस-४ चा वापर केला. पहिले अस्त्र म्हणजे ’सेक्स!‘ १९५० च्या दशकापासून प्लेबॉय आणि पेंटहाऊस या मासिकांनी नग्न स्त्रियांचे प्रदर्शन कायदेशिररीत्या केले. अत्यंत प्रसिद्ध मॉडेल्स, तारका या मासिकांच्या सेंटर पेजवर यायला स्पर्धा करू लागल्या. टोकाची अश्लिलता व व्यभिचार हॉलीवूडमधून नाईट क्लबमध्ये जाणीपपूर्पक प्रसारित करण्यात आला. ब्ल्यू फिल्म, लाईव्ह सेक्स आणि कत सेक्सचे उघड प्रदर्शन आज समाजात प्रचलित झाले आहे. कलेच्या नावाखाली अत्यंत हीन आणि गलिच्छपणाचे प्रदर्शन प्रत्येक चित्रपटात सुरू आहे. सेन्सॉर बोर्डाच्या नियमांना धाब्यावर बसवून बेशरमपणे फिल्मी जगताचा नंगानाच आपण बघत आहोत. आपण सर्व निर्विकारपणे या सांस्कृतिक विध्वंसात सहभागी झालो आहोत.

भांडवलशाहीचे दुसरे अस्त्र म्हणजे ’शराब!‘ तिने सामान्य माणसाला नशेमध्ये चूर करून दिशाहीन केले आहे. दारूचा, ड्रग्जचा खप वाढविण्यासाठी सिनेमाचा वापर मोठया प्रमाणात होतो. दबंगमध्ये सलमान खानने पोलीस स्टेशनलाच दारूचा अड्डा करून टाकले आणि डोक्यावर दारूची बाटली घेऊन इन्स्पेक्टर नाचतो आणि गरजतो, ’है तुझ मे पुरे बोतल की नशा!‘ असाच नाच करताना मुले आज रस्त्या्वर दिसतात. पोलीस स्टेशनला दारूचा अड्डा करून टाकला तरी एकाही पोलीस अधिकार्याने तक्रार करू नये, हे आपल्या देशाचे केवढे मोठे दुर्दै् आहे. तिसरे अस्त्र म्हणजे ’सुद‘ (व्याज). आजदेखील या व्याजापायी लाखो गरिबांनी आत्महत्या केल्या आहेत. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्या कर्जाने संपूर्ण जगालाच कर्जबाजारी केले आहे. ज्याच्याकडे पैसा असतो त्याला व्याज मिळते. काही मेहनत व उत्पादन न करता पैशाला पैसा मिळतो. म्हणून श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात व गरीब कर्जबाजारी होऊन लाचार होतात.

आणि सर्वात प्रबळ अस्त्र म्हणजे ’श्रद्धा‘ होय. धर्म, जात, भाषा व वर्ण यापर माणसांचे विभाजन करण्यात येत आहे. हिंदू- मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत. ती कधीच एकत्र राहू शकत नाहीत, हा सिद्धांत इंग्रजांनी लोकप्रिय केला. या दोन्ही धर्मामध्ये द्वेषभावना निर्माण करून भारताचे तुकडे केले. आज तेच काम दहशतवादाच्या नावाखाली अमेरिकन इस्ट इंडिया कंपनी करत आहे. एकीकडे अमेरिका पाकिस्तानी सैन्याचा उपयोग करून इस्लामच्या नावावर भारतात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे इस्रायलचा उपयोग करून भारतात मनुवादी दहशतवाद निर्माण करते. स्वामी असिमानंदने दिलेल्या कोर्टातील जबानीप्रमाणे, अनेक बॉम्बस्फोट मनुवादी संघटनांनी घडवले व मुसलमानांना त्यात अडकवले. दुसरीकडे करकरेंनी उघडकीस आणलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये इस्रायलने कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय यांना मदत केल्याचे सिद्ध झाले आहे. पण भारत सरकारने मुद्दामहून हा विषय दाबला. २७ नोव्हेंबर २००८ ला म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दुसर्याच दिवशी करकरेंची हत्या करण्यासाठीच मुंबईवरील हल्ला झाला, हे मी जाहीरपणे सांगितले व चौकशी आयोगाची मागणी केली. पण आजतागायत सरकारी व विरोधी पक्ष एकसंघपणे या चौकशीला विरोध करत आहेत. एकंदरीत ’तोडा आणि फोडा‘ या गोर्यांच्या तत्वज्ञानापुढे आपण हतबल होत चाललो आहोत.

अमेरिका ही जगातील एकमेव महासत्ता आहे. ती भारताला महासत्ता कशी बनू देईल? गेल्याच महिन्यात अ.मेरिकन संरक्षण मंत्र्यांनी भारत आणि चीन ही अमेरिकेसमोरील २१ व्या शतकातील आव्हाने आहेत, असे विधान केले. पहिल्यांदा वाजपेयी व नंतर मनमोहन सिंग तर पाकिस्तानमध्ये मुशर्रफ, झरदारी व कयानी अमेरिकेची चमचेगिरी करताना दिसतात. हिंदू-मुस्लिम द्वेषामुळे पाकिस्तान आणि भारताचा जपळपास ५० टक्के पैसा संरक्षण व पोलीस व्यवस्थेपर खर्च होतो. अमेरिका मात्र या दोन्ही देशांना हत्यारे पुरविते आणि प्रचंड पैसा कमावते! सेक्स, शराब, सुद व श्रद्धा ही एस - ४ अमेरिकन भांडवलशाहीची महाभयानक अस्त्रे आहेत. या अस्त्रांमधूनच भावाने भावाला मारण्याची संस्कृती, दहशतवाद, कट्टरपाद, व्यभिचार, अराजकता निर्माण होत आहे.

उद्योगजगताशी अमेरिकन संरक्षण व्यपस्थेचे अत्यंत जपळचे नाते आहे. या विभागाने ५० च्या दशकात अमेरिकन कोकाकोला, पेप्सी घराघरात पोहोचविले. सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकन भाषा, सूट-बूट आणि टाय, इग्लिश साहित्याचा देखील याच पद्धतीने प्रसार करण्यात आला. एकंदरीत पाश्चिमात्य राहणीमानाने आज मध्यमवर्गियांच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला आहे. आणि म्हणूनच आधुनिक भारतामध्ये एक इग्लिश स्पिकींग उच्चभ्रू इंडिया व एक दरिद्री भारत निर्माण झाले. ही सर्व एस-४ ची कमाल आहे. मानसशास्त्रीय युद्ध पभाग हे खाजगी क्षेत्राद्वारे व गुप्तहेर संघटनांद्वारे एस-४ चा प्रसार करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करतो. सेक्स आणि शराबची विक्री अनेक देशात अधिकृतपणे केली जाते. आपणांस आठवत असेल, भारतात विदेशी दारूच्या आयातीला परवानगी नसताना भांडवलदारांच्या घरात सर्रास स्कॉच व्हिस्की मिळायची व अश्लिल चित्रफीतीही मिळायच्या. हे सर्व स्मगलिंगद्वारे भारतात आणले जात असे आणि ते आणणारे स्मगलर्स अमेरिकन गुप्तहेर संघटनेचे एजंट होते. किंबहुना जगामध्ये अमेरिकन सीआयएने एक व्यापक स्मगलिंग यंत्रणा उभी केली आहे. सीआयएमधील मानसशास्त्रीय युद्ध विभागाने पुरस्कृत केलेले धोरण हेरांच्या व स्मगलर्सच्या यंत्रणेमाफर्त पूर्ण जगतात प्रसारीत करण्यात येत आहे. याचे उद्दीष्ट मानवाचे लक्ष मूळ विषयापासून दुसरीकडे वळविण्याचे आहे. प्रत्येक माणसाला सन्मानपूर्पक जीवन जगायचे आहे. सन्मानाचा अर्थ समता आहे. माणसाचे माणसाकडून होणारे शोषण आपण सहन करू शकत नाही. सन्मानाचे जीवन हे विषमतावादी समाजात असू शकत नाही. परंतु समता आणि सन्मान हे अमेरिकन भांडवलशाहीला अभद्र शब्द पाटतात. म्हणूनच लोकशाहीच्या गमजा मारणारी अमेरिकेतील लोकशाही, ही भांडवलदारी लोकशाही आहे. जगातील ५० टक्के पैसा असूनदेखील आज अमेरिकेची वाताहत होत आहे. तिने निर्माण केलेला एस-४ चा भस्मासूर तिलाच भस्म करून टाकत आहे. अमेरिकेतला तरुण हा पॉलस्ट्रीटपर (अमेरिकन सट्टाबाजार पॉलस्ट्रीटमध्ये आहे) उतरला आहे. अमेरिकेने जगावर राज्य करण्यासाठी, मानवजातीला लुबाडण्यासाठी निर्माण केलेल्या एस- ४ च्या पषारी व्यपस्थेने अक्राळपक्राळ रूप धारण केले आहे. या विषयाकडे गांभिर्याने बघण्याऐपजी भारतीय राजकीय नेतृत्व हे अमेरिकेची चाकरी करण्यामध्ये स्वतःला धन्य समजत आहे. अपघाताने असो पा कर्तृत्पाने असो १० हजार पर्षाच्या मानपी इतिहासात पुन्हा एकदा भारतापर सूर्य तळपायला लागला असतानाच, दुसरीकडे हाच भारत अंधकारामध्ये गटांगळ्या खात भरकटत चालला आहे. इतिहासाच्या निर्णायक टप्प्यावर या देशाला सावरून योग्य दिशेला नेण्याचे काम आजचे प्रस्थापित राजकीय नेतृत्व तर करूच शकत नाही. म्हणून नवे राजकीय नेतृत्व निर्माण करणे, ही तातडीची गरज आहे!

( साभार : दै. पुण्य नगरी )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा